Video: “...पण, नरेंद्र मोदींना मारणारा बॉम्ब का मिळत नाही”; नेत्याचं वादग्रस्त विधान
By प्रविण मरगळे | Published: October 4, 2020 03:33 PM2020-10-04T15:33:42+5:302020-10-04T16:27:16+5:30
Former Mla Ram Gulam Uike Controversial Statement About PM Narendra Modi News: गोंगपा नेते रामगुलाम उइके यांचे विधान ३ दिवस जुने असल्याचं सांगण्यात येत आहे, जे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर आतापर्यंत भाजपा नेत्यांकडून कोणताही प्रतिक्रिया मिळालेली नाही.
सिवनी - मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील घंसौर विधानसभेच्या माजी आमदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. गोंडवाना गणतंत्र पार्टीचे माजी आमदार रामगुलाम उइके यांनी एका जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याबाबत वक्तव्य केल्याने वादात अडकण्याची शक्यता आहे.
गोंगपा नेते रामगुलाम उइके म्हणाले की, इंदिरा गांधी यांना मारण्यासाठी गोळी मिळाली, राजीव गांधींना मारण्यासाठी बॉम्ब मिळाला पण नरेंद्र मोदी यांच्यासाठी कोणता बॉम्ब मिळाला नाही, का नाही नरेंद्र मोदींना उडवत? अशा शब्दात त्यांनी लोकांसमोर भडकाऊ भाषण केले आहे. गोंगपा नेत्याच्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.
तसेच त्यांनी कोरोना संसर्गाच्या उपचारात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत अनेक प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, हे सगळे खूनी आपल्या देशात उपस्थित आहेत जे आज सत्तेवर बसलेत. त्यांचे विधान ३ दिवस जुने असल्याचं सांगण्यात येत आहे, जे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर आतापर्यंत भाजपा नेत्यांकडून कोणताही प्रतिक्रिया मिळालेली नाही.
गोंगपा नेत्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त विधान #NarendraModipic.twitter.com/ue288q6W2N
— Lokmat (@MiLOKMAT) October 4, 2020
मध्य प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीत रामगुलाम उइके येथे आमदार म्हणून निवडून आले होते. गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या तिकिटावर त्यांना ५५ हजार ३८९ मते मिळाली होती. त्यांनी कॉंग्रेस पक्षाच्या उर्मिला देवींचा पराभव केला. तथापि, विरोधी पक्षाच्या नेत्याने किंवा टीकाकारांनी पंतप्रधानांच्या मृत्यूसाठी प्रार्थना केलेली ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही सोशल मीडियावर अशा प्रकारच्या अनेक विधान करण्यात आली आहेत.