कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापू लागलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला धक्का देण्यासाठी भारतीय जनता पक्षानं कंबर कसली आहे. गृहमंत्री अमित शहांनी नुकताच राज्याचा दौरा केला. या दरम्यान तृणमूलच्या अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पुढील वर्षी होऊ घातलेली विधानसभा निवडणूक चुरशीची होणार असल्याचं दिसत आहे.एका बाजूला भाजपनं विधानसभेसाठी आक्रमकपणे तयारी सुरू असताना निवडणूक रणनीतीतज्ज्ञ प्रशांत किशोर यांनी महत्त्वाचं भाकीत केलं आहे. 'पश्चिम बंगालमध्ये दुहेरी आकडा ओलांडताना भाजपला संघर्ष करावा लागेल. भाजपचं समर्थन करणारा माध्यमांमधला गट त्यांना गरजेपेक्षा जास्त महत्त्व देत आहे,' असं प्रशांत किशोर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. माझं ट्विट सेव्ह करून ठेवा. भाजपनं दुहेरी आकडा गाठल्यास ट्विटर सोडेन, असंदेखील किशोर यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.
बंगालमध्ये दुहेरी आकडा ओलांडायलाही भाजपला संघर्ष करावा लागेल; निवडणूक रणनीतीकाराचा दावा
By कुणाल गवाणकर | Published: December 21, 2020 12:18 PM