लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: नेहमी कार्यकर्ते आणि नागरिकांच्या गराडयामध्ये असणाऱ्या ठाण्यातील लोकप्रतिनिधींनीही रविवारच्या ‘जनता कर्फ्यू’मध्ये सहभाग घेतला. या काळात आवडती गाणी ऐकत आवडत्या पदार्थांवर ताव मारल्याचे राज्याचे गृहनिर्माणमंत्री तथा कळवा मुंब्रा येथील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी कुटूंबीयांसमवेत तर आमदार संजय केळकर यांनी वाचन करण्यात आपला वेळ घालविल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.ठाण्याचे खासदार विचारे यांच्या चरईतील निवासस्थानी तसेच कार्यालयातही नेहमीच वर्दळीचे वातावरण असते. रविवारी विचारे यांनी जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर लोकांशी थेट संपर्क करणे तसेच बाहेर पडणेही टाळले. त्याआधी गेली दोन दिवस फिलीपाईन्स येथे अडकलेल्या मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील वैद्यकीय शिक्षण घेणाºया ६० विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यात बराच वेळ गेला. त्यामुळे रविवारी थोडी विश्रांती घेतल्याचे ते म्हणाले. याव्यतिरिक्त फोनवरुनच कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांद्वारे याच संदर्भातील आढावा घेतला. बाकी बहुतांश वेळ बराच दिवसांनी कुटूंबीयांसमवेत घालविल्याचेही विचारे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल नागरिकांचेही त्यांनी आभार मानले.तर आमदार संजय केळकर यांच्या तीन पेट्रोल पंप परिसरातील कार्यालयातही ते नेहमी नागरिकांच्या भेटी घेत असतात. आपण शनिवारी रात्री पासूनच पंतप्रधानांच्या आवाहनानुसार या जनता कर्फ्यूमध्ये सहभाग घेतल्याचे सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून वाचन करता आले नव्हते. ते या काळात केले. वृत्तवाहिन्यांद्वारे बातम्यांमधून माहिती घेतली आणि इतर वेळ कुटूंबियांसमवेत घालविल्याचेही केळकर म्हणाले.* गाणी ऐकली- जितेंद्र आव्हाडया काळात कार्यकर्तेच काय अगदी घरातील नोकरांनाही सुटी दिली. वर्तमानपत्रांचे वाचन केले. आवडती गाणी ऐकत आवडत्या पदार्थांवर ताव मारल्याचे राज्याचे गृहनिर्माणमंत्री तथा कळवा मुंब्रा येथील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लोकमतला सांगितले. घराबाहेर न पडता, तो व्हिडिओ मात्र बनवून लोकांनाही घराबाहेर न पडण्याचे आवाहन केल्याचे त्यांनी सांगितले.
काय करीत होते ‘जनता कर्फ्यू’ काळात ठाण्यातील खासदार आणि आमदार
By जितेंद्र कालेकर | Published: March 24, 2020 1:53 AM
‘जनता कर्फ्यू’ काळात ठाण्यातील खासदार आणि आमदार काय करीत होते? या काळात त्यांनीही जनसंपर्क करणे टाळून फोनवरुनच लोकांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले.
ठळक मुद्देखासदार राजन विचारे यांनी कुटूंबीयांसमवेत तर आमदार संजय केळकर यांनी वाचनात घालविला वेळ‘जनता कर्फ्यू’ काळात जनसंपर्कही टाळला