नाशिकला दत्तक घेणारा बाप गेला कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 01:19 AM2018-09-03T01:19:13+5:302018-09-03T01:20:25+5:30
नाशिक : मुख्यमंत्र्यांनी नाशिकला दत्तक घेतले, पण एक नवा प्रकल्प आला नाही, एकलहरा औष्णिक वीज केंद्र बंद पडले आहे आणि काही प्रकल्प आणि उद्योग नागपूरला स्थलांतरित होत आहेत अशा अनेक तक्रारी करतानाच आपण काही तरी केले पाहिजे, असा सूर कार्यकर्त्यांनी लावला खरा मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दत्तक घेणारा बाप गेला कुठे? असा प्रश्न केला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

धुळे येथे सभेसाठी गेलेल्या राज ठाकरे यांचे रविवारी (दि.२) नाशिकला आगमन झाले. बऱ्याच कालावधीनंतर राज यांचे नाशिक शहरात आगमन झाल्याने कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी मी नेहेमीच बोलतो आज तुम्ही बोला, असे सांगिंतले आणि मग कार्यकर्त्यांनी एकेक करीत मुद्दे मांडले.
नाशिक शहरातील मुख्य समस्या म्हणजे एकलहरे औष्णिक केंद्र बंद करण्यात येणार असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारावर प्रतिकूल परिणाम होणार आहे, नवे सुरू होणारे संच नागपूर येथे स्थलांतरित करण्यात आले आहेत, त्याचप्रमाणे राज्यातील अन्य विभागांच्या तुलनेत नाशिकला विजेचे दर जास्त असून, त्यामुळे उद्योग स्थलांतरित होत आहेत. नाशिक महापालिकेत भाजपाची सत्ता असून, तीन आमदार आहेत. पालकमंत्री त्यांचेच आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतले आहे, परंतु तरीही पाच वर्षांत नाशिकला एकही मोठा उद्योग येऊ शकला नाही, असे एका कार्यकर्त्याने सांगताच दत्तक घेणारा बाप गेला कुठे? असा मार्मिक टोला राज यांनी लगावला. दरम्यान, याचवेळी एका कार्यकर्त्याने महापालिकेने मोठ्या प्रमाणात करवाढ केली असून, नागरिकांचा त्याला विरोध आहे. स्केटिंग स्टेडियमसाठी साकडेगोल्फ क्लब मैदानालगत आंतरराष्टÑीय दर्जाचे स्केटिंग स्टेडियम साकारण्यासाठी खासगीकरणातून प्रयत्न सुरू असून, महापालिकेच्या मदतीने हा प्रकल्प साकारण्यासाठी राज ठाकरे यांंनी लक्ष घालावे, अशी मागणी सुजाता डेरे यांच्या नेतृत्वाखाली स्केटिंग असोसिएशनने केली.