VIDEO: आज मी या देशाला वचन देते की...; उद्धव ठाकरेंवर तोफ डागत कंगनाची मोठी घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 05:19 PM2020-09-09T17:19:35+5:302020-09-09T17:23:40+5:30

मुंबईत येताच कंगनाची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका

will make movie on kashmiri pandit kangana ranaut makes announcement | VIDEO: आज मी या देशाला वचन देते की...; उद्धव ठाकरेंवर तोफ डागत कंगनाची मोठी घोषणा 

VIDEO: आज मी या देशाला वचन देते की...; उद्धव ठाकरेंवर तोफ डागत कंगनाची मोठी घोषणा 

googlenewsNext

मुंबई: शिवसेना आणि अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला आहे. मुंबई महापालिकेनं कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयावर (Kangana Ranaut's office) कारवाई केली. या कारवाईचे फोटो ट्विट करत कंगनानं पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. कंगनानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करून जोरदार टीका केली. मुंबईत दाखल झाल्यानंतर कंगनानं तिच्या ऑफिसमधील व्हिडीओ पोस्ट करून संताप व्यक्त केला. 

कंगनानं १२ सेकंदांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यामध्ये तिच्या पाली हिल येथील कार्यालयात झालेली तोडफोड दिसत आहे. कोसळलेलं छत, मोडलेल्या वस्तू यामध्ये अगदी स्पष्ट दिसत आहेत. 'डेथ ऑफ डेमोक्रसी' अशा तीन शब्दांत कंगनानं तिच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाईवर भाष्य केलं आहे. मुंबईत दाखल झालेली कंगना सध्या तिच्या खार येथील निवासस्थानी आहे.



यानंतरच्या एका ट्विटमधून कंगनानं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. विशेष म्हणजे तिनं मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला आहे. ''उद्धव ठाकरे तुला काय वाटतं, तू बॉलिवूड माफियांसोबत मिळून माझं घर उध्वस्त करून मोठा बदला घेतला आहेस? आज माझं घर मोडलं आहे, उद्या तुमचा हा अहंकार मोडून पडेल. वेळ नेहमी एकसारखी नसते. हे करून तुम्ही माझ्यावर खूप उपकार केले.. काश्मीरी पंडितांवर काय संकट आलं असेल हे माहीत होतं, परंतु आज मी ते स्वतः अनुभवलं. आज मी देशाला वचन देते की, मी फक्त अयोध्यावर नाही, तर काश्मीर पंडितांवरही चित्रपट तयार करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र,'' असं कंगनानं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 



सकाळी राम मंदिरावरून सरकार लक्ष्य; आता काश्मिरी पंडितांवरील चित्रपटाची घोषणा
कंगनानं एका ट्विटमध्ये आपल्या कार्यालयाला राम मंदिर म्हणत त्यावर कारवाई करणाऱ्यांची तुलना थेट बाबराशी केली आहे. 'मणिकर्णिका फिल्ममध्ये पहिल्या चित्रपटाची घोषणा झाली, त्याचं नाव अयोध्या होतं. त्यामुळे ही माझ्यासाठी केवळ एक इमारत नाही, तर राम मंदिर आहे. आज तिथे बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. राम मंदिर पाडलं जातं आहे. पण बाबर, तू हे लक्षात ठेव, तिथेच पुन्हा राम मंदिर उभारलं जाईल. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम,' असं कंगनानं ट्विटमध्ये म्हटलं आहे.  

छत्रपतींच्या महाराष्ट्रात इतकं घाबरट सरकार कधीही बघितलं नाही : देवेंद्र फडणवीस

का केली कारवाई? 
तळमजल्याजवळील शौचालयाच्या जागेत ऑफिससाठी केबिन,  स्टोअर रूममध्ये अनधिकृतपणे स्वयंपाकघर, जेवणासाठी अनधिकृतपणे जागा तयार, जिन्याजवळ आणि तळमजल्याजवळच्या पार्किंग लॉटमध्ये दोन अनधिकृत शौचालये बांधली, पहिल्या मजल्यावर अनधिकृतपणे केबिन, देवघरातच बैठकीसाठी रूम, स्लॅब टाकून अनधिकृत शौचालय, पहिला मजला अनधिकृतपणे वाढवला.

'हा ड्रामा गरजेचा आहे का?' कंगनाच्या ऑफिसवर कारवाई केल्यानंतर रेणुका शहाणेने साधला सरकारवर निशाणा

दुसर्‍या मजल्यावरील जिन्याच्या रचनेत बदल, बाल्कनीत फेरफार, स्लॅब टाकून मजल्याचा उभा विस्तार, शौचालय तोडून त्या जागेचा इतर गोष्टींसाठी  वापर, बाजूच्या बंगल्यातील एक बेडरूम पार्टिशन तोडून स्वत:च्या बंगल्यात सामावून घेतला, बंगल्याच्या मुख्य गेटची दिशा बदलली.  Kangana Ranaut critisized on Maharashtra CM Uddhav Thackeray 

आम्हीच बाबरी तोडणारे, ऑफिसवर कायद्यानुसार कारवाई; संजय राऊतांचा कंगनावर पलटवार

पालिकेच्या कारवाईला न्यायालयाकडून स्थगिती
कंगना राणौतच्या कार्यालयात मुंबई महापालिकेकडून सुरू असलेल्या कारवाईला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. या प्रकरणी कंगनानं दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं पालिकेला दिले आहेत. त्यामुळे कंगनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात होण्याच्या काही वेळापूर्वीच पालिकेनं कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई थांबवली होती. 

Web Title: will make movie on kashmiri pandit kangana ranaut makes announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.