होय, रश्मी शुक्ला यांनी माझ्यावर दबाव आणला होता; ठाकरे सरकारमधील मंत्र्याची कबुली 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 05:56 AM2021-03-26T05:56:27+5:302021-03-26T05:57:03+5:30

त्या काळामध्ये मी भाजपसोबत जावे यासाठी शुक्ला मला भेटल्या होेत्या. मात्र, मला शिरोळ तालुक्यातील जनतेने निवडून दिले आहे, त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय निर्णय घेणार नसल्याचे शुक्ला यांना सांगितले होते.

Yes, I was pressured by Rashmi Shukla; Confession of a minister in the Thackeray government | होय, रश्मी शुक्ला यांनी माझ्यावर दबाव आणला होता; ठाकरे सरकारमधील मंत्र्याची कबुली 

होय, रश्मी शुक्ला यांनी माझ्यावर दबाव आणला होता; ठाकरे सरकारमधील मंत्र्याची कबुली 

googlenewsNext

कोल्हापूर : राज्यात सरकार स्थापन करतेवेळी मी भाजपसोबत जावे यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी माझ्यावर दबाव टाकला होता, अशी कबुली आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे. शुक्ला यांनी दबाव टाकला होता, असे ट्विट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्याला यड्रावकर यांच्या कबुलीने पुष्टी मिळाली आहे. 

ही बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याही कानावर घातल्याचे यड्रावकर म्हणाले. सरकार स्थापन करताना यड्रावकर यांच्यावर रश्मी शुक्ला यांनी दबाव टाकला होता, असे ट्विट आव्हाड यांनी केल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. यानंतर यड्रावकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी संध्याकाळपर्यंत फोन न उचलण्याची भूमिका घेतली होती. संध्याकाळी मात्र त्यांनी ही कबुली दिली.

यड्रावकर म्हणाले, त्या काळामध्ये मी भाजपसोबत जावे यासाठी शुक्ला मला भेटल्या होेत्या. मात्र, मला शिरोळ तालुक्यातील जनतेने निवडून दिले आहे, त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय निर्णय घेणार नसल्याचे शुक्ला यांना सांगितले होते. त्यानुसार मेळावा घेऊन, जनतेची मते आजमावून शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, असेही यड्रावकर यांनी स्पष्ट केले. गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही पत्र परिषदेत तसाच आरोप केला होता.

Web Title: Yes, I was pressured by Rashmi Shukla; Confession of a minister in the Thackeray government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.