बेकायदा वाळूउपसा करणारे १० ट्रक पकडले
By admin | Published: March 26, 2017 01:34 AM2017-03-26T01:34:23+5:302017-03-26T01:34:23+5:30
देऊळगावराजे (ता. दौंड) परिसरात महसूल विभागाची कारवाई करण्यात आली. या परिसरात अवैध वाळूवाहतूक
देऊळगावराजे : देऊळगावराजे (ता. दौंड) परिसरात महसूल विभागाची कारवाई करण्यात आली. या परिसरात अवैध वाळूवाहतूक होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये गेली दोन दिवस सचित्र प्रसिद्ध झाले होते. त्यानुसार तहसीलदार विवेक साळुंखे यांनी महसूलचे पथक तयार करून या भागात अवैध वाळूवाहतूक करणारे दहा ट्रक पकडण्यात आले.
या पथकामध्ये ५० ते ५५ कर्मचारी बरोबर घेण्यात आले होते. यामध्ये नायब तहसीलदार धनाजी पाटील, मंडलाधिकारी संजय स्वामी, मंडलाधिकारी प्रकाश भोंडवे, तलाठी बालाजी जाधव, तलाठी संतोष ईडुळे, तलाठी बारवकर, शरद लोंढे, हरिचंद्र फरांदे इत्यादी कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.
ही कारवाई करताना तहसीलदार विवेक साळुंखे यांनी कमालीची गुप्तता पाळली होती. त्यामुळे ही मोहीम फत्ते करण्यामध्ये प्रशासनाला यश आले. एकाच ठिकाणी वाळूने भरलेल्या १० ट्रक पकडले.
या ट्रकमधील सर्व ट्रकचालक पळून गेले; परंतु, तहसीलदारांनी बाहेरून ट्रक ड्रायव्हर बोलावून सर्व ट्रक केले आहेत. सर्व पकडलेल्या ट्रकवर दंडात्मक कारवाई व प्रतिबंधक म्हणून त्यांच्याकडून बॉण्ड करून घेणार असल्याने वाळूवाहतूकदारांचे धाबे दणाणले आहे. ही कारवाई काल रात्रीपासून चालू होती. त्यामुळे महसूलातील सर्व कर्मचारी पकडलेल्या ट्रकजवळ रात्रभर बसून होते.
परिसरातील अवैध वाळूवाहतूक करणाऱ्या ट्रक मालकांना याचा चांगलाच धसका बसला आहे.