शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
4
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
5
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
7
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
9
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
10
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
11
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
12
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
13
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
14
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
16
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
17
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
18
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"

११०० मान्यवरांसोबत झळकलेले '' झळकी ''...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 7:00 AM

कधी अपमान,तर कधी सन्मान यांच्या हिंदोळ्यावर हातची नोकरी गमावून देखील ते या छंदापासून दूर गेले नाही..

ठळक मुद्देसिनेमाच नव्हे नाटक, संगीत, क्रीडा, राजकारण अशा अनेक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश

- दीपक कुलकर्णी-पुणे : बालगंधर्व रंगमंदिरात कार्यक्रमासाठी गेले असताना तिथे त्यांनी रंगभूमीचे नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत फोटो काढला. त्यानंतर त्यांना सेलिब्रेटी लोकांसोबत फोटो काढण्याचा छंदच जडला..मग ऊन, वारा, पाऊस, दिवस रात्र, नोकरी अशी कशाचीही पर्वा न करता ते आजतागायत फक्त धावताहेत ते मान्यवरांच्या फोटोसाठी.. कधी अपमान,तर कधी सन्मान यांच्या हिंदोळ्यावर हातची नोकरी गमावून देखील ते या छंदापासून दूर गेले नाही.. पण ते आजही स्वत:चा छंद सांभाळून आनंदी आहे.

तब्बल ११०० सेलिब्रेटींसोबत त्यांनी फोटो तर काढलेच पण पुन्हा जेव्हा कधी त्यांची भेट झाली तेव्हा कलर प्रिंटवर दिमाखात ऑटोग्राफ देखील घेतात...अशा या छंद वेड्या कलाकाराचे नाव आहे नागेश उर्फ नागण्णा झळकी..   सोलापूर जिल्हयातील नागण्णा नावावरुन आणि त्याला अवगत वाटत असलेल्या भाषेवरुन जरी कर्नाटकी वाटत असले तरी ते महाराष्ट्रीयन असल्याचे छातीठोकपणे सांगतात. त्याचा हा छंद साधारणपणे सहा ते सात वर्षांपूर्वी सुरु झाला. तेव्हापासून ते आत्तापर्यंत फक्त सिनेमाच नव्हे नाटक, संगीत, क्रीडा, राजकारण अशा अनेक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. त्यात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, क्रिेकेटपटू जहीर खान,अजय जडेजा, अभिनेते नाना पाटेकर, भरत जाधव,अनुपम खेर, डॉ .श्रीराम लागू, विक्रम गोखले, गायक जगजित सिंग, पंकज उधास, आशा भोसले, शंकर महादेवन संगीतकार, अनु मलिक, संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा, यांसारख्या तब्बल ११०० मान्यवरांसोबतचा फोटोसंग्रह त्यांच्याकडे आहे.
पण या छंदाची जपणूक करताना नेहमी सहजासहजीच थोर सेलिब्रेटींचे फोटो उपलब्ध होणार असतात. एकतर या लोकांच्या मूडप्रमाणे हे लोक वागतात. त्याचा फटका कधी बसेल ते सांगता येत नाही..पण कधी कधी त्यांना सिनेमाक्षेत्रातल्या महान हस्तींच्या विस्मयकारक व सन्मानजनक पाहुणचाराचा मानही पदरी पडला आहे.हा छंद जोपासताना त्यांना मदत होते ती श्रीनिवास कुलकर्णी या मित्राची..तो वेळातवेळ काढून त्यांना सोबत करतो.     झळकी म्हणाले,अमिताभ बच्चन हे माझे आवडते अभिनेते होते. हा छंद जडल्यावर मला अनामिकपणे त्यांच्यासोबत फोटो काढण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. परंतु, त्यांची भेट मिळणे तितकेसे सोपे नव्हते. पण माज्या आॅफिसमधील राजीव बापट नावाच्या सहकाºयामुळे ही संधी मिळाली. एक दिवस गोरेगाव फिल्म सिटीत श्रेया घोषाल यांना भेटायला गेलो असताना तिथे अनेपेक्षितपणे अमिताभजींच्या सहाय्यकाचा फोन आला व त्यांनी भेटीचे निमंत्रण दिले. तोपर्यंत त्यांच्याशी सहाय्यकाशी फोनवर चर्चा करत होतो. पण जेव्हा महानायक अमिताभजींची भेट घडली आणि त्यांच्यासोबत फोटो मिळाला तो क्षण फक्त ५ मिनिटांच्या आतला असेल. पण तो माज्यासाठी अवाक् करणारा होता. त्यानंतर त्यांची वेगवेगळ््या ठिकाणी कार्यक्रमादरम्यान एकूण चारवेळा भेट झाली. किरण शांताराम व बिग बींसह काढलेला एकत्रित फोटो अविस्मरणीय आठवण आहे. 

एक कटू आठवण सांगताना झळकी यांनी सांगितले,  सुमन कल्याणपूर ज्येष्ठ गायिका  सुमन कल्याणपूरकर यांचा टिळ्रक स्मारक येथे कार्यक्रम होता. त्यादिवशी सकाळपासून त्यांच्यासह फोटो काढायचे मनोमन ठरविले.पण त्यांनी सपशेल नकार देत तुम्ही गाणे ऐकायला आला की फोटो काढायला अशा शब्दांत खरडपट्टी काढली. आजतागायत लता मंगशेकर यांना भेटण्याचा चार ते पाच वेळा योग आला पण त्यांच्यासोबत अद्यापही फोटो आणि सहीच्या प्रतीक्षेत ते आहे. परंतु, याउलट खलनायक म्हणून प्रचलित असलेले रणजित यांना त्यांच्या घरी भेटण्यासाठी गेलो असताना त्यांच्याकडे माज्या अगोदर आलेल्या एका सिनेमा दिग्दर्शकाला थांबवत त्यांनी आम्हांला वेळ दिला. हा माज्यासाठी आश्चयार्चा धक्का होता तर होताच एका खलनायक अभिनेत्याच्या आत वसलेल्या माणसाचे दर्शन घडले. अभय देओल याच्यासोबत फोटो क्लिक करण्यासाठी तर तब्बल १३ तास एका खुर्चीवर बसून राहिलो होतो. असे एक ना अनेक प्रसंगांनी छंद जोमात जपण्याचा प्रयत्न करत आहे.     अचानक कंपनीतून कमी करण्यात आले तेव्हा कुटुंबाच्या उदरनिवार्हाचा प्रश्न उपस्थित झाला. मात्र हार न मानता पुन्हा आपल्या छंदाला व्यावसायिकतेत रुपांतरित करत पूर्णवेळ फोटोग्राफी करण्याचे ठरविले. आता सिनेमाविषयक कार्यक्रम, जुन्या व नव्या गाण्यांवर आधारित संगीत रजनी कार्यक्रमांची फोटोग्राफी करण्याचे काम करतो. तब्बल तीन वेळा सलग तेरा तास फोटोग्राफी केल्याचे ते आवर्जून सांगतात. ...........हल्ली कुठल्याही सेलेब्रिटींचा फोटो काढायचा म्हटलं की दडपण येते. कारण त्यांच्या भोवती असणारे सुरक्षारक्षकांचे कवच त्यांना भेटू देत नाही. पूवीर्चा कलाकारांशी होणारा संवाद कुठेतरी फक्त सेल्फीमध्ये अडकलेला दिसतो. सोशलमीडियामुळे कलाकारांचाही मोकळेपणा दिवसेंदिवस हरवत चालला आहे. सध्या प्रत्येक कलाकार प्रचंड धावपळीत असतो. त्यांच्या पोहचणे ते निघण्यापर्यंतच्या संपूर्ण  वेळेची गणित ठरलेले असताना फोटोसाठी मोठी कसरत करावी लागते. पण ही कसरत आणि होणारी धावपळ दूर व्हायला त्या मान्यवर व्यक्तींसोबत मिळणारा एखादा फोटो आणि काहीक्षण पुरेसे ठरतात.- नागण्णा झळकी.

टॅग्स :PuneपुणेcinemaसिनेमाPoliticsराजकारण