पुणे: चुकीच्या पद्धतीने केलेल्या खोदकामाला जबाबदार धरून रिलायन्स जिओ कंपनीकडून महापालिकेने १२ लाख ७३ हजार ५०० रूपयांची नुकसान भरपाई वसूल केली. महापालिकेला खोदकामाचे शुल्क जमा करताना लिहून दिले होते त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने त्यांनी खोदकाम केले होते.काँग्रेसचे शहर सरचिटणीस ऋषीकेश बालगुडे यांनी महापालिकेच्या निदर्शनास ही बाब आणली. केबल टाकण्यासाठी रस्ते खोदाईचे काम दोन पद्धतीने केले जाते. एक पद्धत रस्ते वरून न खोदता जमिनीखालून खोदला जातो व नंतर त्यात केबल सोडतात. दुसरी पद्धत रस्ता वरून खोदतात व नंतर त्यात केबल टाकतात. दोन्हीसाठीचे शुल्क वेगवेगळे आहे.रस्ता जमिनीखालून खोदून काम करणार असे रिलायन्स जिओ कंपनीने महापालिकेले लिहून दिले होते, प्रत्यक्षात मात्र त्यांनी रस्ता वरून खोदून केबल टाकली. बालगुडे यांनी ही बाब महापालिकेच्या निदर्शनास आणली. त्यामुळे महापालिकेने कंपनीकडून त्या पद्धतीनुसार येणारा शुल्कातील १२ लाख ७३ हजार ५०० रूपयांचा फरक कंपनीकडून वसूल केला.
रिलायन कंपनीकडून १२ लाखांची भरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 10:15 PM
रिलायन्स जिओ कंपनीने महापालिकेले लिहून दिले होते, प्रत्यक्षात मात्र त्यांनी रस्ता वरून खोदून केबल टाकली. बालगुडे यांनी ही बाब महापालिकेच्या निदर्शनास आणली.
ठळक मुद्दे रिलायन्स जिओ कंपनीकडून १२ लाख ७३ हजार ५०० रूपयांचा फरक वसूल