पुण्यातील नळस्टॉप चौकात उभा राहणार १४ मीटर रूंदीचा चौपदरी दुहेरी पूल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 12:23 PM2020-10-20T12:23:54+5:302020-10-20T12:25:28+5:30

पुण्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच दुहेरी उड्डाणपूल असणार आहे.

A 14 meter wide four lane double bridge will be constructed at Nalastop Chowk in Pune | पुण्यातील नळस्टॉप चौकात उभा राहणार १४ मीटर रूंदीचा चौपदरी दुहेरी पूल

पुण्यातील नळस्टॉप चौकात उभा राहणार १४ मीटर रूंदीचा चौपदरी दुहेरी पूल

Next
ठळक मुद्देनोव्हेंबर अखेरीस होणार कामाला सुरूवात

पुणे: नळस्टॉप चौकातील महामेट्रोच्या दुहेरी उड्डाण पुलाच्या कामाला नोव्हेंबर अखेरीस सुरूवात होईल. १४ मीटर रूंदीचा हा चौपदरी पूल मेट्रोच्या खांबांच्या मध्यभागाला जोडून असेल. पुण्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच दुहेरी उड्डाणपूल असणार आहे.

नळस्टॉप चौकातील वाहतुकीवरचा सगळा ताण त्यामुळे कमी होणार आहे. सोनल हॉलपासून तो सुरू होईल व एसएनडीटी महाविद्यालयाच्या थोडे पुढे संपणार आहे. त्याची लांबी साधारण ३५० मीटर आहे. मध्यभागी तो ऊंच असेल व त्याच्या दोन्ही बाजूंना उतार असेल. कर्वे रस्त्याच्या लागून असणार्या जोडरस्त्याने ज्यांंना जायचे नाही असे सर्व वाहनधारक या पूलाचा वापर करतील. मेट्रोच्या खांबांपासून दोन्ही बाजूंना प्रत्येकी ७ मीटर रूंदीचा पूल असेल. त्याचे प्रत्येकी दोन म्हणजे एकूण चार भाग आहेत. प्रत्येक भाग साडेतीन मीटर रूंदीचा आहे. दुचाकी वाहनांसह चार चाकी वाहनांसाठीही पूल खुला असणार आहे. 


जमिनीपासून पूलाची ऊंची ८ मीटर आहे. त्यावर पूल व नंतर पून्हा पुलाच्या वर मेट्रो मार्ग आहे. त्यामुळे वरून मेट्रो धावत असताना या पूलावरून वाहने जातयेत असतील व त्याचवेळी रस्त्यावरही वाहतूक सुरू असेल. 
मेट्रोच्या खांबांच्या मधून पूलासाठी सध्या जोड काढण्यात आले आहेत. त्यावर गर्डर्स टाकून काँक्रिटचा स्लँब टाकला जाईल. सध्या रस्त्याच्या कडेला गर्डर्स आणून ठेवण्यात आले आहेत. लवकर ते टाकण्याचे काम सुरू केले जाईल. खांबांवर मेट्रो मार्गाचे स्लँब टाकण्याचे सर्व काम रात्री करण्यात आले होते. हेही काम रात्रीच करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे. ---/// 

कोरोना टाळेबंदी व त्यामुळे मजुरांची कमतरता यातून मेट्रोच्या एकूणच कामाचे वेळापत्रक बिघडले. आता मजूर परतले असून कामाला गतीही आली आहे. नोव्हेंबर अखेरीस पुलाच्या कामाला सुरूवात होईल. साधारण ६ महिन्यात काम पूर्ण होईल.
अतुल गाडगीळ, संचालक ( प्रकल्प) महामेट्रो.
---///

महामेट्रो व महापालिका संयुक्तपणे हे काम करत आहे. त्यासाठी ३५ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. महापालिकेने खर्चाचा पहिला ८ कोटी रूपयांचा वाटा दिला आहे. पूलाच्या कामाचे नियोजन महामेट्रोने केले असून पुण्यातील हा सर्वात आकर्षक पूल होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 
हेमंत सोनवणे, सरव्यवस्थापक, (जनसंपर्क) महामेट्रो. 
---///

Web Title: A 14 meter wide four lane double bridge will be constructed at Nalastop Chowk in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.