कान्हूरमेसाई : माणसाला कितीही मिळाले तरी ते कमीच पडते असे म्हणतात. जि. प. शिक्षकांच्या बाबतीत ते एकदम खरे ठरतात. दिवाळीसाठी १३ दिवसांची घसघशीत सुटी मिळाल्यावरही गुरुजी नाखूशच आहेत. गुरुजींना १३ नव्हे १९ दिवसांची सुटी हवी म्हणून जिल्हा परिषदेच्या पायऱ्या झिजवणे सुरू आहे .पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना ५ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुट्टी जाहीर झाली आहे.त्यातून ४, ११, व १८ तारखेचा रविवार आल्याने १५ दिवसांची दीर्घ सुटी मिळाली आहे. मात्र मुळात शिक्षक असल्याने ते अधिकच हुशार. त्यांनी इतर जिल्हा परिषदेच्या तारखा शोधल्या आणि पुणे जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांच्या टेबलावर टाकल्या. अहमदनगर जिल्हा परिषदेने ५ ते २२ नोव्हेंबरपर्यंत शिक्षकांना दिल्या आहेत; मग पुणे जिल्हा परिषदेच्या सुट्या कमी का केल्या, असा सवाल शिक्षक संघटनांनी शिक्षणाधिकारी, अधिकाºयाना विचारला आहे.दिवाळीच्या सुटीत काहीही बदल होणार नसून आहे त्या तशाच राहणार आहे. संघटनेने पत्र दिले आहे. मी त्याची खात्री केली. एकूण सुट्या यावर्षीच्या ७६ सुट्यांच्या मर्यादेतच बसवाव्या लागतात. त्या बरोबर बसलेल्या आहेत की नाही याची खात्री करून घेतली असून त्याच्यात बदल होणार नाही.-सुनील कुºहाडे, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, पुणे
१५ दिवसांची सुटी; तरीही गुरुजी नाखूशच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 1:19 AM