पुणे : संपूर्ण देशभरात कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. तर राज्यात मुंबईपाठोपाठ पुण्यातही कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढू लागले आहे. शहरात १ जानेवारीपासून कोरोनाबाधितांमध्ये वाढ होऊ लागली आहे. जानेवारीच्या पंधरा दिवसात ही रुग्णवाढ ५० हजारांच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. तर केवळ १७ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
पुणे महापालिकेने चाचण्यांचे प्रमाणही वाढवले आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. पण मृत्यूचे प्रमाण नगन्य असल्याचे दिलासादायक चित्र आहे. तसेच ४ - ५ टक्के रुग्ण हे हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. तर इतर रुग्णांना सौम्य लक्षणे असल्याने गृहविलगीकरणाचा पर्याय सुचवण्यात आला आहे.
एक जानेवारीला ३९९ रुग्ण आढळून आले होते. तर १२७ जण कोरोनामुक्त झाले होते. तर १६ जानेवारीपर्यंत एका दिवसात आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या ५३७५ वर पोहोचली आहे. तर याच दिवशी ३०९० जण कोरोनामुक्त झाले आहेत. या सोळा दिवसात शहरात एकूण ४९ हजार ३७६ रुग्ण आढळून आले आहेत. तर फक्त १६ हजार ९१८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील २६ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या तीन चार दिवसापासून हा आकडा ५ हजारच्या वर गेला आहे. १५ तारखेला ५ हजार ७५० रुग्ण आढळून आले होते. तर काल ती संख्या २०० ने कमी झाली असून ५ हजार ३७५ वर आली आहे. सद्यस्थितीत ३४ हजार १८७ सक्रिय रुग्ण आहेत.
रुग्णांना भासत नाही ऑक्सिजनची गरज सद्यस्थितीत शहरातील बऱ्याच नागरिकांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत. त्यामुळे नवीन आढळणाऱ्या रुग्णांमध्ये सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसून येत आहेत. तसेच रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर ७ - ८ दिवसात बरा होत आहे. रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत नसल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे प्रमाणही कमी आहे.
तरीही मास्क बंधनकारक आताच्या कोरोना रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असली तरी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. त्याची तपासणी कडक करण्यात आली असून विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे.
५० रुपयांचा मास्कसाठी बसू शकतो ५०० चा भुर्दंड सध्याचा कोरोना संसर्ग वेगाने पसरू लागला आहे. त्यावर आता अतिशय माफक दरात उपलब्ध असणारा एन ९५ मास्क घालण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञानी केले आहे. असे असतानाही अनेक नागरिक मास्क वापरत नाहीत. त्यामुळे ५० रुपये किंवा त्यापेक्षा कमी किमतीत मिळणारा मास्क न वापरल्याने ५०० रुपयांचा भुर्दंड तुम्हाला बसू शकतो असे पोलिसांनी सांगितले आहे.
नवे रुग्ण कोरोनामुक्त
१ जानेवारी ३९९ १२७२ जानेवारी ५२४ ७९३ जानेवारी ४४४ १२०४ जानेवारी ११०४ १५१५ जानेवारी १८०५ १३१६ जानेवारी २२८४ ८०७ जानेवारी २७५७ ६२८८ जानेवारी २४७१ ७११९ जानेवारी ४०२९ ६८८१० जानेवारी ३०६७ ८५७११ जानेवारी ३४५९ ११०४१२ जानेवारी ४८५७ १८०५१३ जानेवारी ५५७१ २३३५१४ जानेवारी ५४८० २६७४१५ जानेवारी ५७५० २३३८१६ जानेवारी ५३७५ ३०९०
एकूण ४९, ३७६ १६,९१८