इंदापूरमधून २५00 टन द्राक्ष निर्यात

By admin | Published: May 13, 2016 01:17 AM2016-05-13T01:17:02+5:302016-05-13T01:17:02+5:30

युरोपातील देशांमध्ये यंदा राज्यातून ८४ हजार ४९५ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. मागील वर्षी ४१ हजार ७८३ टन द्राक्ष निर्यात झाली होती. तुलनेत यंदाची द्राक्ष निर्यात दुपटीने वाढली आहे.

2500 tons of grape exports from Indapur | इंदापूरमधून २५00 टन द्राक्ष निर्यात

इंदापूरमधून २५00 टन द्राक्ष निर्यात

Next

कळस : युरोपातील देशांमध्ये यंदा राज्यातून ८४ हजार ४९५ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. मागील वर्षी ४१ हजार ७८३ टन द्राक्ष निर्यात झाली होती. तुलनेत यंदाची द्राक्ष निर्यात दुपटीने वाढली आहे. यात इंदापूर तालुक्यातून २५00 टन द्राक्ष निर्यात झाली.
अवर्षणाचे वर्ष असतानाही ठिबक सिंचन, शेततळी याचा वापर करून आपल्या फळबागांचा दर्जा चांगला राखला त्यामुळे निर्यातीला प्रोत्साहन मिळत आहे.
नाशिक, पुणे, नगर, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या जिल्ह्यातून द्राक्ष निर्यात झाली आहे. ग्रेपनेटच्या माध्यमातून युरोपात यंदा आजवरची सर्वाधिक द्राक्ष निर्यात झाली. युरोपातील द्राक्ष निर्यातीच्या नोंदीशिवाय चीन, रशियातही लक्षणीय द्राक्ष निर्यात झाली. काळ्या द्राक्षांना या देशांमधून चांगली मागणी होती. याशिवाय शेजारच्या बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंका, तसेच रशिया या देशांमध्येही महाराष्ट्रातील द्राक्षे गेली आहेत. पाण्याची कमतरता असली तरी हवामानाने साथ दिल्याने उत्पादनात वाढ झाली.
चांगल्या बागांमध्ये हेक्टरी सरासरी २५ टनांपर्यंत द्राक्ष उत्पादन निघाले आहे. इंदापूर तालुक्यातील शेतकरी नेहमीच निर्यातीला वाव देत आहेत. अवर्षण परिस्थिती आहे. मात्र, यामधूनही ठिबक सिंचन, शेततळी याचा वापर करून आपल्या फळबागांचा दर्जा चांगला राखला त्यामुळे निर्यातीला प्रोत्साहन मिळत आहे. यावर्षी कळस, बोरी, काझड, भरणेवाडी व तालुक्याच्या काही भागांमधून सुमारे २५०० टन द्राक्षे निर्यात झाली आहे. भारत शिंदे, उपाध्यक्ष, बारामती इंदापूर फलोत्पादन सहकारी संघ इंदापूर तालुक्यामधील शेतकऱ्यांनी नेहमीच निर्यातीला वाव दिला आहे.
फळबागांमधून दर्जेदार उत्पादन घेतल्यामुळे निर्यातीत वाढ होत आहे. अवर्षण परिस्थिती आहे तरी ठिंबक सिंचन, शेततळी यामुळे पाणीटंचाईवर मात करत आपल्या कल्पकतेला वाव देऊन जास्तीत जास्त क्षेत्रावरील द्राक्षे निर्यात करण्यावर भर दिला आहे.
जम्बो जातीचे जास्त क्षेत्र निर्यात झाले आहे, अधिकच दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा निर्यातीकडे कल वाढत आहे. तालुक्यामध्ये सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्र द्राक्षे पिकाखाली आहे, गतवर्षी १८०० टन द्राक्षे निर्यात झाली होती. यावर्षी सुमारे २५०० टन द्राक्षे निर्यात झाल्याचे दिसून येते असे तालुका कृषी अधिकारी सूर्यभान जाधव यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: 2500 tons of grape exports from Indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.