अबब ! ३ डझन संत्रीला १ हजार ११ रुपये भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 08:30 PM2018-04-03T20:30:49+5:302018-04-03T20:30:49+5:30

संत्रीच्या दरातील सर्व विक्रीम मोडीत काढत राजेंद्र करंडे यांच्या संत्रीला सर्वाधिक १ हजार १० रुपये दर मिळाला.

3 dazen oranges costing Rs.1 thousand 11rupees | अबब ! ३ डझन संत्रीला १ हजार ११ रुपये भाव

अबब ! ३ डझन संत्रीला १ हजार ११ रुपये भाव

Next
ठळक मुद्देसर्वसाधारणपण संत्रीला ४०० ते ६०० रुपयांपेक्षा जास्त दर मिळत नाही. उन्हाळ्यात संत्रीची आवक घटण्यास सुरूवात

पुणे: अहमदनगर जिल्ह्यातील देहरे येथील शेतक-याच्या तीन डझन संत्रीला तब्बल १ हजार ११ रुपये दर मिळाला. गुलटेकडी येथील मार्केटयार्डात मंगळवारी दाखल झालेल्या संत्रीला हा सर्वाधिक दर मिळाला आहे. दरम्यान, नियोजनबध्द पध्दतीने शेती केली तर ती फायदेशीर ठरू शकते,असे मत संत्री उत्पादक शेतकरी राजेंद्र करंड यांनी व्यक्त केले.
संत्रीच्या दरातील सर्व विक्रीम मोडीत काढत राजेंद्र करंडे यांच्या संत्रीला सर्वाधिक १ हजार १० रुपये दर मिळाला. त्यानिमित्ताने पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती व आडते असोसिएशनतर्फे करंडे यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी बाजार समितीचे उपसभापती भूषण तुपे,सचिव बी.जे.देशमुख,राजेंद्र कोरपे,आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष युवराज काची,खजिनदार सुर्यकांत थोरात,सतीश उरसळ,रोहन उरसळ,आदी उपस्थित होते.
अहमदनगर येथील शेतकरी राजेंद्र करंडे यांनी गेल्या रविवारी तब्बल दोन टन संत्री मार्केट यार्डात विक्रीसाठी आणली होती. त्यातील चांगल्या दर्जाच्या ३ डजन संत्रीला ९५१ रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला होता. एका फळाचे वजन ४०० ते ४५० ग्रॅम होते. सर्वसाधारणपण संत्रीला ४०० ते ६०० रुपयांपेक्षा जास्त दर मिळत नाही. मात्र, मंगळवारी त्यांच्या ३ डझन संत्रीला सर्वाधिक १ हजार ११ रुपयांचा दर मिळाला. उन्हाळ्यात संत्रीची आवक घटण्यास सुरूवात होते. मात्र, करंडे यांनी झाड्यांवर योग्य वेळी फवारणी केली तसेच पाण्याचे योग्य नियोजन केले.त्यामुळे त्यांच्या संत्रीला चांगला दर मिळाला.
भूषण तुपे म्हणाले,करंडे यांनी स्थानिक शेतक-यांना दर्जेदार संत्री पिकवण्याच्या पध्दतीबाबत मार्गदर्शन केले आहे.त्यांनी गुलटेकडी येथील मार्केटमध्ये दाखल केलेल्या दर्जेदार संत्रीमुळे बाजार समितीच्या लौकिकात भर पडली आहे.
देशमुख म्हणाले, नगर जिल्हा मोसंबीसाठी प्रसिध्द आहे. तसेच मराठवाड्यात संत्रीला चांगला दर मिळत नाही,अशी ओरड केली जाते.मात्र,करंडे यांनी नियोजनपणे दर्जेदार संत्री पिकवली.इतर शेतक-यांनी त्यांच्याकडून आदर्श घ्यायला हवा.
करंडे म्हणाले,गेल्या दहा वर्षांपासून मी संत्रीचे उत्पादन घेत आहे. पूर्वी मी मुंबई येथे शेतीमाल घेवून जात होतो.परंतु,पुण्यात ज्या पारदर्शकपणे शेतीमालाचे वजन केले जाते.तसेच दर्जेदार मालाला भाव दिला जातो.तसा दर मुंबईत मिळत नाही.त्यामुळे मी पुण्यातच संत्री घेवून येतो.गेल्या रविवारी माझ्या संत्रीला ९५१ रुपये तर मंगळवारी १ हजार ११ रुपये दर मिळाला.

Web Title: 3 dazen oranges costing Rs.1 thousand 11rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.