बारामतीत ३०० कोटींची विकासकामे

By Admin | Published: December 31, 2014 11:18 PM2014-12-31T23:18:08+5:302014-12-31T23:18:08+5:30

१८६५ मध्ये स्थापन झालेली बारामती नगरपालिका यंदा आजपासून १५० वे स्थापना वर्ष साजरा करीत आहे. काळानुसार बदल होत असताना नगरपालिकेचा दर्जा देखील बदलत आहे.

300 crore development works in Baramati | बारामतीत ३०० कोटींची विकासकामे

बारामतीत ३०० कोटींची विकासकामे

googlenewsNext

बारामती : १८६५ मध्ये स्थापन झालेली बारामती नगरपालिका यंदा आजपासून १५० वे स्थापना वर्ष साजरा करीत आहे. काळानुसार बदल होत असताना नगरपालिकेचा दर्जा देखील बदलत आहे. नगरपालिकेची हद्द पाचपट वाढली आहे. त्याच अनुषंगाने ३०० कोटी रुपयांची विकास कामे पालिकेच्या माध्यमातून पूर्णत्वाला गेली आहे. तर काही कामे सुरू आहेत. बारामतीकरांच्या अपेक्षेनुसार यापुढच्या काळात देखील विकास कामे केली जातील, अशी ग्वाही नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, मुख्याधिकारी दीपक झिंझाड यांनी दिली.
१ जानेवारी १८६५ साली बारामती नगरपालिकेची स्थापना झाली. बारामतीला पूर्वी ‘भिमथडी’ नावाने ओळखले जात. काळानुसार नगरपालिकेचा कारभार देखील बदलला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बारामतीला वैभव प्राप्त झाले. ते पुढे जवळपास ६० वर्षे टिकले. त्यानंतर १८३९ सालापासून इंग्रजांचा अंमल बारामतीवर होता. ब्रिटिश काळातच नगरपालिकेची स्थापना झाली. आता बारामती नगरपालिकेच्या हद्दीची वाढ झाली आहे. रूई, जळोची, तांदूळवाडी, बारामती ग्रामीण या लगतच्या गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ‘अ’ वर्ग नगरपालिका म्हणून दर्जा प्राप्त होईल. आज या संदर्भात ‘लोकमत’ ला माहिती देताना नगराध्यक्ष सोमाणी, मुख्याधिकारी झिंझाड यांनी सांगितले की, सुजल निर्मल अंतर्गत साठवण तलाव, बायोगॅस प्रकल्प, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम पॅव्हेलियन, मोरोपंत वाचनालयाचे नूतनीकरण, केंद्राच्या योजनेतून मासळी बाजार, प्रायोगिक तत्त्वावर २४९ घरांची योजना, व्यापार संकुलसह २६ कोटी ९ लाखांची कामे मार्गी लागली आहेत. त्याच अनुषंगाने ३५४ दशलक्ष लिटर्स क्षमतेचा साठवण तलाव, हद्दवाढीतील रस्ते, भूमिगत गटार योजना, नवीन प्रशासक इमारत, रेल्वे उड्डाणपूल, विशेष अनुदानातून वाढीव हद्दीतील रस्ते, सांडपाणी प्रकल्प, पथदिवे बसविणे असे १८६ कोटी २५ लाख रुपयांची कामे सुरू आहेत. तर १२४ कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहे. त्यामध्ये बहुमजली वाहनतळ मंडई, रस्ते, गटार, स्मशानभूमी, शारदानगर ते मोरगाव रोड रस्ता, हद्दवाढीतील पथदिवे भूमिगत करणे, उद्याने विकसित करणे, रूई भागातील पाणी पुरवठा, विद्युतीकरण असे विविध प्रकारची कामे नव्या हद्दवाढीतच आहेत. आधुनिक मासाळी बाजारामुळे ग्राहकांना तसेच विक्रेत्यांची सोय झाली आहे. (प्रतिनिधी)

वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम
बारामती नगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त १ जानेवारी रोजी कै. वसंतराव पवार नाट्यगृह येथे सायंकाळी ६ वाजता चहापान, सांस्कृतिक एकपात्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन नगराध्यक्ष सोमाणी, मुख्याधिकारी दिपक झिंजाड, नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी केले आहे

४ नगरपालिका स्थापनेचे दीड शतक साजरे करीत असताना नवीन प्रशासकीय इमारत पूर्णत्वाला जात आहे. तालुकास्तरावर नगरपालिकेचे अत्याधुनिक प्रशासकीय इमारतीसाठी १३ कोटी ३७ लाख रुपये खर्च करण्यात येत आहे. बारामती शहर तसेच हद्दवाढीतील सर्व रस्त्यांच्या लगत भूमिगत विद्युत वाहिन्या टाकल्या जात आहेत. त्यामुळे विद्युत ताराविरहित बारामती शहर म्हणून ओळखले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

Web Title: 300 crore development works in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.