शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसनं कोणत्या मार्गावर चालायला हवं? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, ओढली 'लक्ष्मणरेषा'!
2
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
3
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
4
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
5
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
6
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
7
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
8
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
9
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
10
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
11
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
12
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
13
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
14
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
15
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
16
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
17
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
19
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
20
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

बारामतीत ३०० कोटींची विकासकामे

By admin | Published: December 31, 2014 11:18 PM

१८६५ मध्ये स्थापन झालेली बारामती नगरपालिका यंदा आजपासून १५० वे स्थापना वर्ष साजरा करीत आहे. काळानुसार बदल होत असताना नगरपालिकेचा दर्जा देखील बदलत आहे.

बारामती : १८६५ मध्ये स्थापन झालेली बारामती नगरपालिका यंदा आजपासून १५० वे स्थापना वर्ष साजरा करीत आहे. काळानुसार बदल होत असताना नगरपालिकेचा दर्जा देखील बदलत आहे. नगरपालिकेची हद्द पाचपट वाढली आहे. त्याच अनुषंगाने ३०० कोटी रुपयांची विकास कामे पालिकेच्या माध्यमातून पूर्णत्वाला गेली आहे. तर काही कामे सुरू आहेत. बारामतीकरांच्या अपेक्षेनुसार यापुढच्या काळात देखील विकास कामे केली जातील, अशी ग्वाही नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, मुख्याधिकारी दीपक झिंझाड यांनी दिली.१ जानेवारी १८६५ साली बारामती नगरपालिकेची स्थापना झाली. बारामतीला पूर्वी ‘भिमथडी’ नावाने ओळखले जात. काळानुसार नगरपालिकेचा कारभार देखील बदलला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बारामतीला वैभव प्राप्त झाले. ते पुढे जवळपास ६० वर्षे टिकले. त्यानंतर १८३९ सालापासून इंग्रजांचा अंमल बारामतीवर होता. ब्रिटिश काळातच नगरपालिकेची स्थापना झाली. आता बारामती नगरपालिकेच्या हद्दीची वाढ झाली आहे. रूई, जळोची, तांदूळवाडी, बारामती ग्रामीण या लगतच्या गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ‘अ’ वर्ग नगरपालिका म्हणून दर्जा प्राप्त होईल. आज या संदर्भात ‘लोकमत’ ला माहिती देताना नगराध्यक्ष सोमाणी, मुख्याधिकारी झिंझाड यांनी सांगितले की, सुजल निर्मल अंतर्गत साठवण तलाव, बायोगॅस प्रकल्प, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम पॅव्हेलियन, मोरोपंत वाचनालयाचे नूतनीकरण, केंद्राच्या योजनेतून मासळी बाजार, प्रायोगिक तत्त्वावर २४९ घरांची योजना, व्यापार संकुलसह २६ कोटी ९ लाखांची कामे मार्गी लागली आहेत. त्याच अनुषंगाने ३५४ दशलक्ष लिटर्स क्षमतेचा साठवण तलाव, हद्दवाढीतील रस्ते, भूमिगत गटार योजना, नवीन प्रशासक इमारत, रेल्वे उड्डाणपूल, विशेष अनुदानातून वाढीव हद्दीतील रस्ते, सांडपाणी प्रकल्प, पथदिवे बसविणे असे १८६ कोटी २५ लाख रुपयांची कामे सुरू आहेत. तर १२४ कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहे. त्यामध्ये बहुमजली वाहनतळ मंडई, रस्ते, गटार, स्मशानभूमी, शारदानगर ते मोरगाव रोड रस्ता, हद्दवाढीतील पथदिवे भूमिगत करणे, उद्याने विकसित करणे, रूई भागातील पाणी पुरवठा, विद्युतीकरण असे विविध प्रकारची कामे नव्या हद्दवाढीतच आहेत. आधुनिक मासाळी बाजारामुळे ग्राहकांना तसेच विक्रेत्यांची सोय झाली आहे. (प्रतिनिधी)वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमबारामती नगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त १ जानेवारी रोजी कै. वसंतराव पवार नाट्यगृह येथे सायंकाळी ६ वाजता चहापान, सांस्कृतिक एकपात्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन नगराध्यक्ष सोमाणी, मुख्याधिकारी दिपक झिंजाड, नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी केले आहे४ नगरपालिका स्थापनेचे दीड शतक साजरे करीत असताना नवीन प्रशासकीय इमारत पूर्णत्वाला जात आहे. तालुकास्तरावर नगरपालिकेचे अत्याधुनिक प्रशासकीय इमारतीसाठी १३ कोटी ३७ लाख रुपये खर्च करण्यात येत आहे. बारामती शहर तसेच हद्दवाढीतील सर्व रस्त्यांच्या लगत भूमिगत विद्युत वाहिन्या टाकल्या जात आहेत. त्यामुळे विद्युत ताराविरहित बारामती शहर म्हणून ओळखले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.