विवाहाच्या आमिषाने महिलेकडून ४ लाख ८५ हजारांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 07:47 PM2019-04-12T19:47:13+5:302019-04-12T19:48:08+5:30
जीवनसाथी डॉट कॉम या ऑनलाईन विवाह नोंदणी संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर एकाला लग्नाचे आमिष दाखवले...
पुणे : जीवनसाथी डॉट कॉम या ऑनलाईन विवाह नोंदणी संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर एकाला लग्नाचे आमिष दाखवले. तसेच तिचे पार्सल सोडवून घेण्यासाठी बँक खात्यावर ४ लाख ८५ हजार रुपये भरायला सांगून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़
याप्रकरणी कसबा पेठेत राहणाऱ्या एका ५५ वर्षाच्या व्यक्तीने फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. फियार्दी हे एका खासगी कंपनीत कामाला आहे. कौटुंबिक वादातून त्यांची पत्नी माहेरी राहत आहे. त्यांना २१ वर्षांचा मुलगा असून तो गतिमंद आहे. पत्नीबरोबरचा वाद व मुलाच्या संगोपनाचा प्रश्न असल्याने तक्रारदाराला पुर्नविवाह करायचा होता. त्यासाठी त्यांनी वर्षभरापूर्वी एका विवाह नोंदणी संकेतस्थळावर नोंदणी केली होती. त्यांच्यापुढे एका महिलेने विवाहाचा प्रस्ताव ठेवला. त्यावेळी महिलेने ती वसई भागात वास्तव्यास असल्याची माहिती त्याला दिली. महिलेने विवाहाची इच्छा प्रदर्शित केल्यानंतर त्यांनी तिच्याबरोबर संपर्क साधला. त्यानंतर महिलेने फिर्यादीकडे इंग्लडवरुन पाठविलेले पार्सल सोडवून घेण्यासाठी वसई शाखेच्या बँक खात्यात पैसे भरायला सांगितले़. गेल्या वर्षभरात फिर्यादीला ४ लाख ८५ हजार रुपये भरायला सांगितले़. फिर्यादी यांनी तीन महिन्यांपूर्वी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़. परंतु, तिचा मोबाईल बंद असल्याचे आढळून आले़. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती़. त्यावरुन फरासखाना पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़.