खंडाळा घाटातील बस अपघातात 5 जण ठार; 24 जखमी; चालकाचा ताबा सुटल्याने घडली दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 08:52 AM2019-11-04T08:52:02+5:302019-11-04T09:33:57+5:30
ही खाजगी प्रवासी बस कराडहून मुंबईच्या दिशेने एक्सप्रेस वेला लागूनच असलेल्या जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील गारमाळ घाटातून खाली उतरत असताचा चालकाचा गाडीवरील ताबा सुटला
लोणावळा : मुंबई पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळा बोरघाटा लगतच्या गारमाळ घाटातील वळणावर खाजगी प्रवासी बस पलटी झाल्याने या बस मधील पाच प्रवाश्यांचा मृत्यु झाला तर 24 जण जखमी झाले आहेत. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात बस रस्त्यावरुन काही फुट दरी गेली आहे.
सर्वज्ञा सचिन थोरात (वय 3, रा. कराड), स्नेहा जनार्दन पाटील (वय 15, रा. घाटकोपर), जनार्दन पाटील (वय 45, रा. घाटकोपर), संजय शिवाजी राक्षे (वय 50, रा. पवई) व प्रमिला रामचंद्र मोहिते (वय 50, रा. बेलवले बु. कराड) अशा पाच जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.
Maharashtra: 4 people dead and around 30 injured after a bus driver lost control of his vehicle on old Pune-Mumbai highway, near Bhor Ghat, today. pic.twitter.com/r4H3cl5g7r
— ANI (@ANI) November 4, 2019
मिळालेल्या माहिती नुसार (एमएच 04 एफके 1599) ही खाजगी प्रवासी बस कराडहून मुंबईच्या दिशेने एक्सप्रेस वेला लागूनच असलेल्या जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील गारमाळ घाटातून खाली उतरत असताचा चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व बस रस्ता सोडून काहीशी खोल दरीत गेली. यामुळे झालेल्या अपघातात गाडीमधील एक लहान मुलीसह चार जणाचा मृत्यु झाला तर 24 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमीपैकी 13 जणांना गंभिर स्वरुपाचा मार लागला आहे. सर्व जखमींवर एमजीएम हाँस्पिटल कामोठे, पवना हाँस्पिटल सोमाटणे, लोकमान्य हाँस्पिटल निगडी, खोपोली हाँस्पिटल याठिकाणी उपचार सुरु आहेत. महामार्ग पोलीस यंत्रणा, देवदूत पथक, अपघातग्रस्तांच्या मदतीला या सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते यांनी सर्व मयत वजखमी यांना बाहेर काढत जखमींना तातडीने उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले.