पुण्यात स्वाइन फ्लूची ६ जणांना लागण
By admin | Published: August 26, 2015 04:36 AM2015-08-26T04:36:01+5:302015-08-26T04:36:01+5:30
शहरात स्वाइन फ्लूची तीव्रता वाढू लागली असून, मंगळवारी या आजाराची लागण झालेले आणखी ६ रुग्ण सापडले. यामुळे लागण झालेल्यांची संख्या ८७७वर पोहोचली आहे.
पुणे : शहरात स्वाइन फ्लूची तीव्रता वाढू लागली असून, मंगळवारी या आजाराची लागण झालेले आणखी ६ रुग्ण सापडले. यामुळे लागण झालेल्यांची संख्या ८७७वर पोहोचली आहे.
ढगाळ हवामानामुळे शहरात सर्दी-खोकला, ताप यांची साथ आली आहे. स्वाइन फ्लूची प्राथमिक लक्षणेही हीच असल्याने रुग्ण भीतीपोटी दवाखान्यांमध्ये धाव घेत आहेत. मंगळवारी १ हजार ४३६ जणांची स्वाइन फ्लूची तपासणी करण्यात आली. त्यांपैकी १३३ संशयितांना टॅमीफ्लू देण्यात आले. लागण झालेले २२ रुग्ण सध्या रुग्णालयात दाखल आहेत. त्यांपैकी ८ जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. पूर्णपणे बरे झालेल्या ५ जणांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.