पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या ‘महापरिवर्तन’ मेळाव्यात पुणे महापालिकेच्या हद्दीत सीएसआर निधीतून राबविण्यात येणाऱ्या ६ प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व प्रकल्पांच्या या वेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारांवर (एमओयू) सही करण्यात येणार आहे.
शासनाने उत्पन्न आणि वाढत्या अपेक्षा या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर कॉपोर्रेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या (सीएसआर) माध्यमातून शासन व खाजगी भागीदारांनी एकत्र येऊन राज्यात महापरिवर्तन घडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी गतवर्षी मुंबईत आयोजित केलेल्या मेळाव्यात राज्यात आरोग्य, जलसंधारण, पोषण, कौशल्य विकास आदी विविध क्षेत्रांत अनेक खाजगी संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. यंदादेखील जानेवारी २०१९ मध्ये मोठ्या प्रमाणात ‘महा-परिवर्तन’ मेळावा घेण्यात येणार आहे. यामध्ये महापालिकेच्या हद्दीत खाजगी संस्थांच्या माध्यमातून सीएसआर निधीतून विविध प्रकल्प राबविण्यात येतात. यापैकी ६ प्रकल्प या मेळाव्यात सादर करण्यात येणार असून, शासनासोबत याबाबत सामंजस्य करार करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांनी सांगितले. नव्या कंपनी कायद्यामुळे ‘सीएसआर’वर खर्च करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कंपन्यांनी मिळविलेल्या नफ्यातून काही हिस्सा सामाजिक उत्तरदायित्व निभावण्यासाठी खर्च करायला हवा, अशी अपेक्षा आहे. त्यानुसार टाटा, अक्षयपत्र, पिरामल स्वास्थ्य, रुबल नागी आर्ट फाउंडेशन, द फूट फाउंडेंशनच्या वतीने शहरात राबविण्यात येत असलेल्या सहा प्रकल्पांचा या महा-परिवर्तन मेळाव्यात सादर करण्यात येणारआहे.मुख्यमंत्री येणार मेळाव्यालाच्यामध्ये द फूट फाउंडेशनचा स्मार्ट सिटी अंतर्गत पोषण आहर प्रकल्प, टाटा ट्रस्टच्या वतीने महापालिकेच्या शाळांमध्ये राबविण्यात आलेला ‘हात धुण्याची सुविधा’, रुबल नागी आर्ट फाउंडेशनच्या वतीने शहरातील झोपटपड्ड्यांमध्ये भिंती रंगवणे, सुशोभीकरण करण्याचा प्रकल्प, पिरामल स्वास्थ्यचा मोबाईल मेडिकल युनिट, व अक्षयपत्र संस्थेच्या वतीने ‘सेंट्रला किचन’अंतर्गत तब्बल २५ हजार विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविणे आदी प्रकल्पांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पांसाठी संबंधित संस्थांबरोबर मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत जानेवारी २०१९ मधील महा-परिर्वतन मेळाव्यात सामंजस्य करार करणार असल्याचे उगले यांनी सांगितले.