अॅट्रॉसिटी खटल्यांसाठी ६ सरकारी वकील
By admin | Published: January 25, 2017 02:32 AM2017-01-25T02:32:54+5:302017-01-25T02:32:54+5:30
अॅट्रॉसिटीचे खटले तातडीने निकाली निघावेत, वेळेत न्याय मिळावा म्हणून राज्य शासनाने पुण्यासाठी ६ विशेष सरकारी वकिलांची
पुणे : अॅट्रॉसिटीचे खटले तातडीने निकाली निघावेत, वेळेत न्याय मिळावा म्हणून राज्य शासनाने पुण्यासाठी ६ विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केली आहे.
पुणे जिल्हा न्यायालयात दाखल असलेल्या अॅट्रॉसिटीच्या खटल्यांचे कामकाज पाहण्यासाठी अॅड. सुनील हांडे, अॅड. विलास पठारे, अॅड. राजेश कावेडिया, अॅड. प्रसन्ना जोशी, अॅड. हिरा बारी, अॅड. संजय पवार या ६ जणांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अॅट्रॉसिटीच्या केसेस दाखल होणे आणि संबंधिताला न्याय मिळणे याचे प्रमाण खूप कमी आहे. अॅट्रॉसिटीनुसार गुन्हे दाखल झाले तरी बहुसंख्य खटल्यांमध्ये पोलिसांनी तपासात त्रुटी ठेवल्याने तसेच ही प्रकरणे योग्य प्रकारे न्यायालयासमोर सादर न केल्याने संशयित आरोपी सहीसलामत सुटत आहेत.