जिल्हा नियोजना अंतर्गत व्यायामशाळासाठी 7 लाखांचे अनुदान देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:24 AM2021-01-13T04:24:34+5:302021-01-13T04:24:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्हा नियोजन समितीच्या वतीने व्यायामशाळा विकास अनुदान योजनेतंर्गत जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित माध्यमिक ...

7 lakh grant for gymnasium under district planning | जिल्हा नियोजना अंतर्गत व्यायामशाळासाठी 7 लाखांचे अनुदान देणार

जिल्हा नियोजना अंतर्गत व्यायामशाळासाठी 7 लाखांचे अनुदान देणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्हा नियोजन समितीच्या वतीने व्यायामशाळा विकास अनुदान योजनेतंर्गत जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, शासकीय विभाग, आदिवासी व समाजकल्याण विभागातंर्गत शासकीय आश्रमशाळा व स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका यांना खुली व्यायामशाळा साहित्य व व्यायामशाळा साहित्य खरेदीसाठी 7 लाखांचे अनुदान वाटप करण्यात येते. पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया मार्फत ही योजना राबविण्यात येत असून, यासाठी 20 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे विभागातंर्गत शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व्यायामशाळा विकास अनुदान योजना राबविण्यात येत असून, त्याची अनुदान मर्यादा कमाल 7 लाख इतकी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अनुसूचित जाती उपयोजनेतंर्गत ज्या गावांत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीमध्ये व्यायामशाळा उपलब्ध असेल तेथे व्यायामसाहित्य उपलब्ध करुन देण्यात येईल तसेच दलित वस्ती किंवा वस्तीच्या नजीकच्या परिसरात सुयोग्य मोकळी जागा उपलब्ध असेल तर खुले व्यायामशाळा साहित्य उपलब्ध करुन देण्यात येईल.

तरी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका व पात्र विभागांनी सदर योजनेचा लाभ घेण्याकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे द्वारा विभागीय क्रीडा संकुल, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, मोझे हायस्कूल समोर येरवडा पुणे येथे उपलब्ध विहित नमुन्यातील अर्जासह प्रस्ताव 20 जानेवारी 2021 पर्यंत सादर करावेत किंवा अर्ज वा अधिक माहितीसाठी www.dsopune.com या वेबसाईटला भेट द्यावी असे आवाहन विजय संतान यांनी केले आहे.

Web Title: 7 lakh grant for gymnasium under district planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.