तुमच्या स्वप्नातलं घर साकारणारं '7 प्लुमेरिया ड्राइव्ह'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 05:06 PM2019-02-22T17:06:38+5:302019-02-22T17:50:07+5:30
हिंजेवाडीपासून अवघ्या १५ मिनिटांवर असलेल्या ताथवडेमध्ये नम्रता ग्रुपचा '7 प्लुमेरिया ड्राइव्ह' हा गृहप्रकल्प साकारला जात आहे. '7 प्लुमेरिया ड्राइव्ह' हा प्रकल्प जागतिक दर्जाच्या सर्वसमावेशक अशा सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण असून तो 16 एकरच्या परिसरात विस्तारलेला आहे.
पुणे - आपल्या स्वप्नातलं घर प्रत्यक्षात साकारायचं म्हटलं की, पहिल्यांदा आपल्या मनात विचार येतो तो म्हणजे घराचं ठिकाण. मग, त्या ठिकाणी असलेलं निसर्गरम्य वातावरण आणि दळणवळणासाठी असणाऱ्या सोयी-सुविधा. अशा मनासारख्या स्वप्नातल्या गोष्टी सत्यात उतरल्या तर त्याचा आनंद काही औरच असतो. असंच तुमच्या स्वप्नातलं घर आणलं आहे, नम्रता ग्रुप आणि भंडारी असोसिएट्सच्या '7 प्लुमेरिया ड्राइव्ह' (7 Plumeria Drive) या गृहप्रकल्पाने.
हिंजेवाडीपासून अवघ्या १५ मिनिटांवर असलेल्या ताथवडेमध्ये नम्रता ग्रुपचा '7 प्लुमेरिया ड्राइव्ह' हा गृहप्रकल्प साकारला जात आहे. '7 प्लुमेरिया ड्राइव्ह' हा प्रकल्प जागतिक दर्जाच्या सर्वसमावेशक अशा सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण असून तो 16 एकरच्या परिसरात विस्तारलेला आहे. तसंच, '7 प्लुमेरिया ड्राइव्ह'मधील घरं पूर्णत: पर्यावरणपूरक कन्स्ट्रक्शनमध्ये साकारली जात आहेत. त्यामुळे तुमच्या कुटुंबियांचा आनंद द्विगुणित होणार आहे. याशिवाय, रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खास लक्ष देण्यात आले आहे. यासाठी फायर फायटिंग सिस्टिम आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
ताथवडेमधील '7 प्लुमेरिया ड्राइव्ह' हा प्रकल्प भूकंप आणि इतर आपत्ती विरोधी तंत्रज्ञान आणि आरसीसी डिझाईनमध्ये जगभरातील प्रसिद्ध आर्किटेक्टच्या कल्पनेतून साकारला जात आहे. याचबरोबर, टेनिस कोर्ट, बास्केटबॉल, स्विमिंगपूल, इनडोअर गेम, जॉगिंग ट्रॅक, मनोरंजनासाठी मिनी थिएटर आणि फिटनेससाठी जिम यासारख्या सुविधा इथे देण्यात आल्या आहेत.
कनेक्टिव्हिच्या बाबतीत विचार केल्यास '7 प्लुमेरिया ड्राइव्ह' हाच एक उत्तम पर्याय आहे. कारण, ताथवडेमधील '7 प्लुमेरिया ड्राइव्ह' हा गृह प्रकल्प महत्वाच्या अशा शिक्षण, व्यवसाय, मनोरंजन, हॉस्पिटल, रेस्टॉरंट या घटकांशी जोडला गेला आहे. या प्रकल्पापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर विद्यार्थ्यांसाठी शाळा, कॉलेज, शहरातील महत्त्वाची रुग्णालये, बँका, एटीएम आणि अन्य जीवनावश्यक सुविधा आहेत. तसेच, प्रकल्पाच्या आजूबाजूला वाकड, हिंजवडी, रावेत, औंध, आकुर्डी ही गावे वसलेली आहेत.
'7 प्लुमेरिया ड्राइव्ह'मध्ये जवळपास80 टक्के मोकळी जागा ठेवण्यात आली आहे. तसंच, येथील प्रत्येक घरातून निसर्गरम्य वातावरणाचा आनंद पॅनोरॅमिक व्ह्यूच्या माध्यमातून घेण्यासाठी खास सुविधा करण्यात आली आहे. नम्रता गृप आणि भंडारी असोसिएट्सच्या '7 प्लुमेरिया ड्राइव्ह' या गृहप्रकल्पात 2,3 आणि 4 बीएचके अशा एकूण 744 घरांची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे येथील घर नक्कीच स्वप्नातलं घर असणार आहे. अशा या स्वप्नातल्या आपलंसं करण्यासाठी लगेच भेट द्या.