पुणे: पुण्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सलग 75 तास लसीकरण मोहीम राबविणार, असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे जिल्ह्याचा कोरोना आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री पवारांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. दोन डोस घेतलेल्यांच्या निष्काळजीपणावर पवारांनी चिंता व्यक्त केली.
अजित पवारांच्या पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे-
-लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांकडून नियमांचं सर्रास उल्लंघन होत आहे.
-सीएसआर फडातून 5 लाख लशींचे डोस उपलब्ध.
-दोन्ही डोस घेतलेल्यांनी काळजी घ्यावी.
-सध्या सिरिंजचा तुटवडा जाणवत आहे.
- सर्वांनी मास्कचा वापर, सोशल डिस्टंस आणि गर्दी टाळण्याचं आवाहन.
- पुण्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात सलग 75 तास लसीकरण कार्यक्रम.
- गर्दी टाळण्याचे पालकमंत्री पवारांकडून आवाहन.
- ससूनमध्ये 40 टक्के कोरोना रुग्ण नगरचे.
- लस घेतल्यावरही मास्क गरजेचा आहे