आंबेगाव तालुक्यात ग्रामपंचायतींसाठी ७६ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:11 AM2021-01-17T04:11:42+5:302021-01-17T04:11:42+5:30
तालुक्यात गावडेवाडी , पिंगळवाडी/लांडेवाडी, अकोळवाडी/कोटमदरा, पिंपळगांव तर्फे महाळुंगे, लौकी, शिरदाळे, जवळे, काठापुर, शिंगवे, गिरवली, शेवाळवाडी, खडकवाडी, भागडी, एकलहरे, खडकी, ...
तालुक्यात गावडेवाडी , पिंगळवाडी/लांडेवाडी, अकोळवाडी/कोटमदरा, पिंपळगांव तर्फे महाळुंगे, लौकी, शिरदाळे, जवळे, काठापुर, शिंगवे, गिरवली, शेवाळवाडी, खडकवाडी, भागडी, एकलहरे, खडकी, पेठ, महाळुंगे पडवळ, वळती, थुगांव, काळेवाडी/दरेकरवाडी, रानमळा, धोंडमाळ/शिंदेवाडी, कोलदरा/गोनवडी,अवसरी खुर्द या २५ ग्रामपंचायतींमध्ये १७५जागेंसाठी ३६६ उमेदवार उभे होते. यासर्वांचे भवितव्य मशिन मध्ये बंद झाले आहे. एकुण मतदाना मध्ये २६ हजार ५४८ पुरूष तर २७ हजार ४९७ स्त्री मतदारांनी मतदान होते यापैकी १९ हजार ७२५ पुरूष व २१ हजार ८८५ स्त्री मतदान झाले. निवडणूकीदरम्यान कुठेही अनुसूचीत प्रकार झाला नाही.
दरम्यान, दि.१८ जानेवारी रोजी घोडेगाव येथे तहसिल कार्यालयात मतमोजणी होणार असून यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दी करू नये, दोन गटांमध्ये तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सुचनांचे काटेकोर सर्वांनी पालन करावे अन्यथा त्यावर १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा घोडेगाव पालिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिला आहे.
१६ घोडेगाव
कोटमदरा येथे मतदान केंद्रावर वयस्कर महिलेला घेऊन जाताना अमोल काळे हे पोलिस कर्मचारी.