Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live Updates : पुण्याच्या वडगाव शेरी मतदार संघातून शरद पवार गटाचे बापू पठारे विजयी झाली आहेत. अजित पवार गटाच्या सुनील टिंगरेंचा पराभव करत पुण्यात महाविकास आघाडीला एक जागा मिळवून दिली आहे. बापू पठारे अवघ्या 5000 मतांनी विजयी झाले आहेत. चौदाव्या फेरीपासून बापू पठारे यांनी आघाडी घेतली होती. ती अखेरपर्यंत टिकवून ठेवत पठारे यांनी विजय मिळवला आहे.
पुण्याच्या वडगाव शेरीत अखेरच्या क्षणापर्यंत महायुतीच्या उमेदवारीबाबत रस्सीखेच सुरु होती. मुळीक यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतला. तेच पराभवाचं कारण असल्याची शक्यता आहे. तसेच टिंगरे यांच्याबाबत पोर्शे अपघात प्रकरण नडले का? याबाबत सवाल उपस्थित केले जात आहेत. माजी आमदार बापू पठारे यांनी भाजपमधून शरद पवार गटात प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली. आता रिंगणार टिंगरे व पठारे असे दोन आजी-माजी आमदार हेच प्रमुख उमेदवार होते. त्यांच्यात लढत झाली. टिंगरे यांना पोर्शे कार अपघात प्रकरण नडणार की त्यांनी केलेली विकासकामे त्यांना तारणार?, पठारे यांनी आमदार असताना मतदारसंघात केलेली कामे त्यांना विजय मिळवून देतील की ऐनवेळी पक्षांतर करणे त्यांना त्रासदायक ठरेल यावरून विजय ठरणार होता. अखेर बापू पठारे विजयी झाले आहेत.
इथं क्लिक करा >>महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४
पठारे यांना विजयाचा विश्वास
कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या जोरावर मी ही निवडणूक जिंकणार आहे. आमच्या विरोधात उमेदवार कोण आहे त्याची आम्हाला काही देणे घेणे नाही. फक्त विकास हा मुद्दा घेऊनच आम्ही जनतेच्या समोर जाणार आहोत. आणि विकासाचा हाच मुद्दा आम्हाला निवडणूक जिंकून देणार आहेत. मुळात ही निवडणूक जनतेनेच हातात घेतली आहे. जनतेनीच ठरवले की त्यांना बापूसाहेब पठारे आमदार हवाय असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. टिंगरे २०१९ चे विजयी उमेदवार
वडगाव शेरी मतदार संघातून सुनील टिंगरे २०१९ साली निवडून आले होते. त्याठिकाणी बापू पठारे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणार आहेत. बापू पठारे २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ३० ते ४० हजारांच्या फरकाने निवडून आले होते. तर २०१४ ला तिसऱ्या नंबरवर राहून पराभूत झाले होते. २०१९ मात्र त्यांनी निवडणूक लढवली नाही. तेव्हा टिंगरे राष्ट्रवादीकडून विजयी झाले होते.