येरवडयात साडेचार एकर जागेवर ट्रॅफिक पार्क उभारणार
By राजू हिंगे | Published: January 10, 2024 07:54 PM2024-01-10T19:54:53+5:302024-01-10T19:56:43+5:30
बॉश कंपनी सीएसआर फंडातून १५ कोटी रुपये खर्च करणार
पुणे : येरवडा येथील इंद्रप्रस्थ उघान येथे साडेचार एकर जागेवर ट्रॅफिक पार्क उभे केले जाणार आहे. त्यासाठी बॉश कंपनी सीएसआर फंडातून १५कोटी रुपये खर्च करणार आहे. पाच वर्ष मेटन्ससह हे पार्क ही कंपनी चालविणार आहे. त्यानंतर हे पार्क पालिकेकडे हस्तांतरीत केले जाणार आहे.
मुलांना लहानपणापासून वाहतुकीचे नियम पाळण्याची सवय लागावी, यासाठी पुणे महापालिकेने औंध येथील ब्रेमन चौकात ट्रॅफिक पार्क साकारले आहे. पुण्यात वाहतुक कोंडी ही सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे सर्वानाच नियम पाळण्याची सवय लागावी यासाठी आता येरवडा येथील इंद्रप्रस्थ गार्डन येथे साडेचार एकर जागेवर बॉश ट्राफिक पार्क उभे केले जाणार आहे. जागतिक दर्जाचे ट्रॅफिक पार्क असणार आहे. बॉश कंपनी पाच वर्षे मेंटनससह हे ट्रॅफिक पार्क चालविणार आहे. पाच वर्षानंतर हे ट्राफिक पार्क पुणे महापालिकेला हस्तांतरित करणार आहे. या संबंधीचा करार बॉश कपंनीबरोबर झाला आहे अशी माहिती पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.
ट्रॅफिक पार्क मध्ये वाहन चालन चालविण्यापासून ट्रॅफिकच्या नियमाचे पालन कसे करावे हे येथे शिकविले जाणार आहे. यामध्ये वाहन चालकांचे समुपदेशन केले जाणार आहे. हेवी व्हेईकल चालवणाऱ्या वाहन चालकांना ताणतणाव न घेता वाहन कसे चालवायचे याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. पुणे महापालिका आणि जिल्हा परिषद शाळेतील विघाथ्याकडुन कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही.
आरटीओकडुन प्रशिक्षणासाठी येणाऱ्याकडून घेतले जाणार शुल्क
ट्रॅफिक पार्कमध्ये वाहतुक नियमाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी आरटीओकडुन या ट्रॅफिक पार्कमध्ये प्रशिक्षणासाठी येणाऱ्याकडून शुल्क आकारले जाणार आहे.