लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पिंपरी चिंचवड व पुणे अशा दोन्ही महापालिकांमध्ये पूर्ण तयारीनिशी उतरण्याचा प्रयत्न आपकडून (आम आदमी पार्टी) होत आहे. त्याच्या नियोजनासाठी आपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक लवकरच पुण्यात होत आहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे, किशोर मांदियान, राज्य संघटक विजय कुंभार व राज्य कार्यकारिणीतील अन्य पदाधिकारी या बैठकीला असतील. १ सप्टेंबरला पिंपरीत व २ सप्टेंबरला पुण्यात ही बैठक होणार आहे. त्यात दोन्ही निवडणुकांचे प्राथमिक नियोजन निश्चित केले जाईल, असे आपचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी सांगितले.
“भारतीय जनता पार्टीचा भ्रष्टाचार, राष्ट्रवादी काँग्रेसचा जातीयवाद, काँग्रेसचा निष्क्रियपणा आणि शिवसेना व मनसेचा धर्मवाद या मुद्द्यांना नागरिकांसमोर आणणार आहोत. आपने दिल्लीत राबवलेल्या लोकोपयोगी योजना सांगून जनमत तयार करून दोन्ही महापालिका जिंकू,” असे आपचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी सांगितले.