लोहगावातील महिलेच्या खुनातील आरोपी मोकाटच; माहिती देणारास पोलिसांतर्फे बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:54 PM2017-10-27T12:54:50+5:302017-10-27T12:57:52+5:30

लोहगावात एका महिलेचा पंधरा दिवसांपूर्वी निर्घृण खून करण्यात आला होता. या गुन्ह्यातील पसार आरोपी सुरेश इंगवले याला पकडण्यात अद्यापही यश आलेले नाही.

Accused in Lohgawah murder case; The prize winner gets information from the police | लोहगावातील महिलेच्या खुनातील आरोपी मोकाटच; माहिती देणारास पोलिसांतर्फे बक्षीस

लोहगावातील महिलेच्या खुनातील आरोपी मोकाटच; माहिती देणारास पोलिसांतर्फे बक्षीस

Next
ठळक मुद्देमहिलेचा खून झाल्यावर चार दिवसांनी हा प्रकार उघडकीस आला होता.आरोपीची माहिती व पकडून देणारास रोख रकमेचे बक्षीस : पोलीस निरीक्षक संजय नाईक पाटील

विमाननगर (पुणे) : लोहगावात एका महिलेचा पंधरा दिवसांपूर्वी निर्घृण खून करण्यात आला होता. महिलेचा खून झाल्यावर चार दिवसांनी हा प्रकार उघडकीस आला. या गुन्ह्यातील पसार आरोपी सुरेश इंगवले याला पकडण्यात अद्यापही यश आलेले नाही. या आरोपीची योग्य माहिती व पकडून देणारास रोख रकमेचे बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय नाईक पाटील यांनी दिली.
विमानतळ पोलिसांनी महिलेसोबत राहणारा सुरेश श्रीमंत इंगवले (वय ४३, रा. मु. पो. मेडशिंग, ता. सांगोला, जि. सोलापूर) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या मूळ गावी व इतर ठिकाणी शोध घेऊनही अद्यापही तो फरारच आहे.
लोहगाव निरगुडी रोड खांदवे बिल्डिंग येथे सुरेश इंगवले हा पंधरा दिवसांपूर्वी एका महिलेसोबत भाड्याने राहत होता. तो खुनाच्या गुन्ह्यानंतर काही दिवसांपासून पसार होता. त्याच्या घरातून दुर्गंधी येत असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी विमानतळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना या घरात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह मिळून आला.
या महिलेचा खून करून आरोपी सुरेश पसार झाल्याचा संशय आहे. सुरेश ट्रेलर चालक असून येथील एका कंपनीत काम करीत होता. महिलेच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याने खून केला असावा, असा संशय आहे.  घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली आहे. चिठ्ठीत एका व्यक्तीचे नाव असल्याचे समजते. पोलिसांनी तपासासाठी घरमालक व अन्य काही व्यक्तींना ताब्यात घेतले होते. मात्र, या गंभीर गुन्ह्याचा अद्यापही तपास लागलेला नाही. या आरोपीबाबत माहिती देणार्‍यास योग्य रोख बक्षीस देण्यात येणार आहे. 

Web Title: Accused in Lohgawah murder case; The prize winner gets information from the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.