सासवड येथील खुन प्रकरणातील आरोपीला नेपाळहून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:09 AM2021-07-16T04:09:17+5:302021-07-16T04:09:17+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क सासवड : सासवड - सोनोरी रस्त्यावरील बोरकर वस्ती जवळ भगवान मारकड यांचा खून करण्यात ...

Accused in Saswad murder case arrested from Nepal | सासवड येथील खुन प्रकरणातील आरोपीला नेपाळहून अटक

सासवड येथील खुन प्रकरणातील आरोपीला नेपाळहून अटक

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

सासवड : सासवड - सोनोरी रस्त्यावरील बोरकर वस्ती जवळ भगवान मारकड यांचा खून करण्यात आला होता. दारू पिण्याच्या कारणावरून त्यांचा खून झाल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी आरोपीला नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आली आहे. खून केल्यानंतर आरोपीने पळून जाण्यासाठी दुचाकीने तब्बल २ हजार ६०० किमी प्रवास करत नेपाळ गाठले. पाेलिसांनीही आपली सर्व क्षमता पणाला लावत आरोपीला अटक केली.

निरंजन सहानी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भगवान मारकड यांच्या डोक्यात घातक शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी त्यांची पत्नी छाया मारकड यांनी फिर्याद दिली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप हे स्वतः करीत होते. भगवान मारकड हा सोनोरी रोडवरील एका टायर रिमोल्डिंगचे दुकानात मजुरीचे काम करीत होता. त्याला दारूचे व्यसन होते. घटनेच्या दिवशी दारू पिण्याच्या कारणावरून आरोपी निरंजन सहानी व त्यांच्यात वाद झाला. याचे स्वरूप मारहाणीत झाले. निरंजनने लाकडी दांडक्याने भगवान मारकड याला मारहाण करून खून केला. निरंजनचा मृतदेह नाल्यांमध्ये फेकून दिला व रात्रीच मोटरसायकलने नेपाळकडे रवाना झाला. नेपाळकडे जाताना दोन राज्यातील सीमेवर त्यास पोलिसांनी अडवले. मात्र, आरोपीने दुचाकी मालकाला खोटे सांगुन व्हाॅटस अॅपवर दुचाकीचे कागदपत्रे मागवून पोलिसांना गुंगारा दिला. याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी त्वरीत एक पथक नेपाळ सीमेवर रवाना केले. मात्र, पोलीस पोहचण्याच्या आधीच आरोपी हा नेपाळला त्याच्या घरी पोहचला. नेपाळमध्ये जाऊन आरोपीला अटक करता येणे शक्य नव्हते. त्यामुळे आरोपीला अटक करण्यासाठी खूप तांत्रिक अडचणी आल्या. स्थानिक पोलिसांचे सहकार्य मिळत नव्हते. अशा वेळी मोबाईल कंपनीचे नोडल ऑफिसर तुषार यांनी अतिशय मोलाचे सहकार्य करत तांत्रिक मदत केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांनी आपले कौशल्य व अनुभव पणाला लावून आरोपीला नेपाळ सीमेवर चलाखीने आरोपीला अटक केली आणि सासवडला आणले. आरोपी निरंजन सहानी यास बुधवारी (दि १३) अटक करण्यात आली. त्याला सोमवार (दि १९) पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.

Web Title: Accused in Saswad murder case arrested from Nepal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.