५ दिवसांत ६०० रिक्षांवर कारवाई; ५० रिक्षा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:15 AM2021-09-14T04:15:24+5:302021-09-14T04:15:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या काही दिवसांत पुण्यात अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. यात रिक्षाचालकाचा समावेश असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ...

Action on 600 rickshaws in 5 days; 50 rickshaws seized | ५ दिवसांत ६०० रिक्षांवर कारवाई; ५० रिक्षा जप्त

५ दिवसांत ६०० रिक्षांवर कारवाई; ५० रिक्षा जप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गेल्या काही दिवसांत पुण्यात अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. यात रिक्षाचालकाचा समावेश असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलीस, आरटीओ प्रशासनाने बेकायदा रिक्षाचालकांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू केले. शहरात विविध ठिकाणी पोलीस व आरटीओने केलेल्या कारवाईत जवळपास ६०० रिक्षाचालकांवर कारवाई केली. यात त्यांना मेमो देण्यापासून ते थेट रिक्षा जप्त करण्यापर्यंतच्या कारवाईचा समावेश आहे. त्यामुळे अनेक रिक्षाचालकांचे धाबे दणाणले आहेत.

पुण्यात जवळपास ९२ हजार रिक्षा आहेत. यातील अनेक रिक्षाचालक बेकायदा व्यवसाय करीत आहेत. गेल्या काही दिवसांत रिक्षा व्यवसायात वाढलेली गुन्हगारी हा चिंतेचा विषय बनला आहे. आरटीओ, वाहतूक पोलिसांनी संयुक्त स्वारगेट बस स्थानक, वाकडेवाडी बस स्थानक परिसरात कारवाईचा धडाका लावला. तर पुणे स्थानक परिसरात लोहमार्ग पोलीस व आरपीएफदेखील आता सक्रिय झाले असून, पुणे स्थानक परिसरात त्यांनी जवळपास १२७ रिक्षाचालकांवर कारवाई केली.

बॉक्स १

आरटीओचे तीन पथक कार्यरत :

आरटीओ प्रशासनाने बेकायदा रिक्षाचालकांवर कारवाई कारण्यासाठी तीन पथके नेमली आहेत. प्रत्येक पथकात एक मोटार वाहन निरीक्षक व दोन सहायक मोटर वाहन निरीक्षकांचा समावेश आहे. ते पुणे स्थानक, स्वारगेट बस स्थानक, वाकडेवाडी स्थानक परिसरात कारवाई करण्यात येत आहे. आरटीओने ९ ते १३ सप्टेंबर दरम्यान ४७३ रिक्षांवर कारवाई केली. यात पुणे स्थानक परिसरात सर्वांत मोठी कारवाई झाली. पुणे स्थानक परिसरात २७५ रिक्षांवर कारवाई झाली. तर स्वारगेट १५७ व शिवाजीनगर बस स्थानक ४१ रिक्षांवर कारवाई झाली.

बॉक्स २

स्थानकांवर गणेशाशिवाय प्रवेश नाही :

पुणे स्थानकावर लोहमार्ग पोलिसांनी रिक्षाचालकांच्या विरोधात कडक भूमिका घेतली. लोहमार्ग पोलिसांनी जवळपास १२७ रिक्षांवर कारवाई केली. शिवाय रात्रीच्या वेळी गुन्हेगारी प्रवृत्तीचे चालक येत असल्याने लोहमार्ग पोलिसांनी रिक्षा थांब्यावर पोलीसदेखील तैनात केला आहे. चालकाकडे जर गणवेश, परमीट, परवाना, बिल्ला किंवा यापैकी एकही बाब नसेल तर त्यांना प्रवेश दिला जात नाही.

कोट १

पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू आहे. आतापर्यंत ही कारवाई शहराच्या विशिष्ठ भागापुरतीच मर्यादित होती. ती आता व्यापक केली जाईल. गरज पडली तर पथकांच्या संख्येत वाढ केली जाईल.

- अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी,पुणे

फोटो - रिक्षा चालक

Web Title: Action on 600 rickshaws in 5 days; 50 rickshaws seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.