पुणे : विरुद्ध दिशेने वाहन चालवून गंभीर स्वरुपाच्या अपघातांना निमंत्रण देणाऱ्या दुचाकीस्वार आणि मोटारचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे़ या वर्षभरात आतापर्यंत ३ हजारांहून अधिक बेशिस्त वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक आहे़. शहरातील वाहतुकीची समस्या गंभीर आहे. पोलीस आयुक्त डॉ. वेंकटेशम यांनी वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी पाऊले उचलली आहेत. वाहतुकीचे नियम पाळा, पादचारी पट्टयांवर (झेब्रा क्रॉसिंग) वाहने उभी करु नका, भरधाव वाहने चालवू नका, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी करण्यात आले आहे. वाहनचालकांचे प्रबोधन करण्यासाठी पोलिसांनी वेळोवेळी मोहीम राबविली. मात्र, भरधाव वाहनचालकांच्या बेदरकारपणामुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी भादंवि २७९ नुसार थेट दखलपात्र गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली.डिसेंबर महिन्यात विरुद्ध दिशेने वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाईची मोहिम तीव्र करण्यात आली. वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरु यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या मोहिमेत १ ते ३० डिसेंबर या कालावधीत विरुद्ध दिशेने वाहने चालविणाºया ८३२ वाहनचालकां विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 9:22 PM
३ हजार जणांवर गुन्हे दाखल : दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक
ठळक मुद्देडिसेंबर महिन्यात विरुद्ध दिशेने वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाईची मोहिम तीव्र