वारजे जकात नाका परिसरातील बेकायदा टपऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:09 AM2021-06-26T04:09:10+5:302021-06-26T04:09:10+5:30
आजची कारवाई ही मात्र व्यावसायिक दुकानांवर झाली आहे. येथील वारजे सर्व्हे नंबर १७ (भाग) व हिंगणे सर्व्हे नं. ...
आजची कारवाई ही मात्र व्यावसायिक दुकानांवर झाली आहे.
येथील वारजे सर्व्हे नंबर १७ (भाग) व हिंगणे सर्व्हे नं. ५१ (भाग) मध्ये महापालिकेच्या समाजकल्याण विकास कार्यालयासमोर
अनेक बेकायदा टपऱ्या मागील दहा बारा वर्षांपासून टाकून ठेवण्यात आल्या होत्या. अनेकदा नोटिसा देऊनही येथील अतिक्रमणधारक टपऱ्या काढत नव्हते. मुख्य रस्त्यावरील जागेचा व्यावसायिक वापर होत असल्याने आता ही कारवाई करण्यात आली, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
सकाळी अकराच्या सुमारास दोन जेसीबीसह महापालिकेचे तीन कनिष्ठ अभियंता, उपअभियंता दोन पोलीस उपनिरीक्षक व सुमारे तीस जणांचा फौजफाट्यासह महापालिकेचे अतिक्रमण पथक तेथे पोहोचले व त्यांनी लागलीच कारवाईस सुरुवात केली.
तासभर चाललेल्या या कारवाईत स्थानिकांच्या विरोधास न जुमानता मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या या कारवाईचे स्थानिकांनी स्वागत केले.
ही कारवाई उपअभियंता देवेंद्र पात्रे यांच्या नेतृत्वाखाली कनिष्ठ अभियंता सतीश शिंदे, विठ्ठल मुळे, संग्राम पाटील, सचिन जावळकर,आरेखक अजित ववले यांनी तसेच वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर खटके निरीक्षक गुन्हे अमृत मराठे यांच्या सोबत सुमारे ४० पोलीस कर्मचारी यांच्या सहभागाने पूर्ण करण्यात आली.
फोटो ओळ :- येथील युनिव्हर्सल शोरूमसमोर टपऱ्यांवर कारवाई करून क्षेत्र मोकळे करण्यात आले.