रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यावर खेड पोलिसांतर्फे कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:09 AM2021-04-17T04:09:13+5:302021-04-17T04:09:13+5:30
सर्वत्र लॉकडाऊन असल्याने जीवनावश्यक सुविधा वगळता सर्वच आस्थापने, दुकाने बंद आहेत. मात्र, तरीही नागरिक विनाकारण रस्त्यावर वाहने घेऊन फिरताना ...
सर्वत्र लॉकडाऊन असल्याने जीवनावश्यक सुविधा वगळता सर्वच आस्थापने, दुकाने बंद आहेत. मात्र, तरीही नागरिक विनाकारण रस्त्यावर वाहने घेऊन फिरताना दिसत आहेत. कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने प्रशासनाने शहरातील फळ विक्रेते व भाजी बाजार देखील बंद केले आहेत.रस्त्यावर धनश्री चौकात पोलिसांनी आज दि. १६ रोजी सकाळपासून कारवाई करण्यास सुरुवात केली. जवळपास शेकडोहून अधिक विनाकारण फिरणारे नागरिक व दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात आली.तसेच वाहने घरी ठेवून विनाकारण रस्त्यावर पायी चालणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या अशा नागरिकांवर यापुढे कारवाई करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांनी करोनाचे गांभीर्य समजून विनाकारण घराच्या बाहेर निघू नका, असे आवाहन पोलिस निरिक्षक सतीश गुरव यांनी केले आहे.
राजगुरूनगर शहरात विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीचालकांवरती खेड पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.