खोर येथे पैसे टाका आणि पाणी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 11:08 PM2019-04-02T23:08:20+5:302019-04-02T23:08:39+5:30
पाण्याची परिस्थिती इतकी भयानक आहे की, ग्रामस्थांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. दोन दिवसांपूर्वी देऊळगावगाडा, पडवी, खोर, भांडगाव या गावांच्या यात्रा पार पडल्या गेल्या.
खोर : पैसे टाका आणि पाणी घ्या... अशी परिस्थिती आज खोर (ता. दौंड) परिसरात निर्माण झाली आहे. या वर्षी दौंड तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये पाऊस झाला नसल्याने या पट्ट्यातील खोर, देऊळगावगाडा, पडवी, कुसेगाव, माळवाडी, नारायण बेट ही गावे आज पाणी... पाणी करीत आहेत.
पाण्याची परिस्थिती इतकी भयानक आहे की, ग्रामस्थांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. दोन दिवसांपूर्वी देऊळगावगाडा, पडवी, खोर, भांडगाव या गावांच्या यात्रा पार पडल्या गेल्या. मात्र, केवळ ४० टक्के पाण्यावर त्या पार पडल्या. यात्रांंवरती देखील पाणीटंचाईचे संकट उभे राहिले गेले. या वर्षी उन्हाळा अतिशय कडक स्वरूपात असल्याने अजून एप्रिल, मे, जून हे तीन महिने पाण्याच्या संदर्भात अतिशय कडक व तीव्र दुष्काळी जाणार असल्याने पाणी जपून वापरण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे.
या वर्षी पाणी नसल्याने शेतकरीवर्गाच्या शेतजमिनी पडीक ठेवण्यात आल्या आहेत. खोरचे उपसरपंच विकास चौधरी व त्यांचे बंधू बापू चौधरी यांनी खोर गावामध्ये कॉईन बॉक्स सेन्सरद्वारे पिण्याचे पाणी ग्रामस्थांंनां कमी पैशांमध्ये देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. कॉईन बॉक्समध्ये पैसे टाका आणि पाणी घ्या, या उपक्रमाच्या माध्यमातून चौधरी यांनी ५0 पैशाला १ लीटर पाणी, ५ रुपयाला १0 लीटर पाणी तर १0 रुपयांना २0 लीटर पाणी या उपलब्ध कॉईन बॉक्सद्वारे मिळत आहे. खोरमधील अनेक ग्रामस्थ, नागरिक, महिलावर्ग या पद्धतीने पाणी सध्या घेत आहेत.
पाणी असूनही विजेअभावी गावे तहानलेली
कवठे : कवठे गावची पाणीपुरवठा योजना घोड नदीच्या फत्तेश्वर बंधाऱ्याहून आहे. फत्तेश्वर बंधारा आता पाण्याने तुडुंब भरला आहे. मात्र, पुरेशा विजेअभावी या परिसरातील २० हजार नागरिकांना पाण्यावाचून वंचित राहावे लागत आहे. यामुळे त्रस्त ग्रामस्थांनी एक दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
४वीजपुरवठ्याबाबत शिरूर तहसीलदारांकडे लेखी निवेदन देऊनदेखील फक्त चार तास वीज उपलब्ध होत असल्याने कवठे गावची पाण्याची तहान पूर्ण होत नसल्याने कवठे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
४फत्तेश्वर बंधाऱ्यापासून कवठे गावचे अंतर तीन किलोमीटर आहे. कवठे गावातील पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी किमान ८ तास विजेची आवश्यकता असते.
४आठ तास वीजपुरवठा उपलब्ध होत नसल्याने पाण्याची टाकी अर्धवट भरली जाते. त्यामुळे गावाला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करणे ग्रामपंचायतीला शक्य होत नाही. याबाबत पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे यांनी कवठे ग्रामस्थांंसह शिरूर तहसीलदारांकडे लेखी निवेदन सादर केले होते.
४तसेच वेळोवेळी तहसीलदार शिरूर यांच्याशी फोनवरून संपर्क करूनदेखील याची दखल घेतली जात नसल्याने प्रशासनाचे याकडे त्वरित लक्ष वेधण्यासाठी कवठे ग्रामस्थांनी संपूर्ण कवठे गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
४याबाबत दोन दिवसांत गावपातळीवर बैठकीचे आयोजन केले असून कवठे गावचा एकदिवसीय गाव बंदचा निर्णय जाहीर केला जाणार आहे.