Koregaon-Bhima : भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर अॅड. प्रकाश आंबेडकर हजर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 12:08 PM2018-11-13T12:08:10+5:302018-11-13T12:16:47+5:30

भीमा कोरेगाव प्रकरणी आयोगासमोर अॅड प्रकाश आंबेडकर आपली बाजू मांडत असून सुनावणीला सुरुवात झाली आहे. आंबेडकर या सुनावणी दरम्यान वढू गावच्या सरपंचांची उलट तपासणी घेण्याची शक्यता आहे. 

Adv Prakash Ambedkar is present before the Bhima Koregaon inquiry commission | Koregaon-Bhima : भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर अॅड. प्रकाश आंबेडकर हजर

Koregaon-Bhima : भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर अॅड. प्रकाश आंबेडकर हजर

Next

पुणे : भीमा कोरेगाव प्रकरणी आयोगासमोर अॅड प्रकाश आंबेडकर आपली बाजू मांडत असून सुनावणीला सुरुवात झाली आहे. आंबेडकर या सुनावणी दरम्यान वढू गावच्या सरपंचांची उलट तपासणी घेण्याची शक्यता आहे. 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगासमोर अॅड. प्रकाश आंबेडकर आपली बाजू मांडत आहेत. सकाळी 10.30 वाजता या सुनावणीला सुरुवात झाली आहे.

पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या सत्यशोधन समितीने तयार केलेल्या अहवालाचा दाखला आंबेडकरांनी आयोगासमोर दिला. या समितीने केलेल्या संशोधनावर पुणे ग्रामीण पोलिसांनी एक रिपोर्ट तयार केला असल्याचे आंबेडकर यांनी आयोगासमोर सांगितले. पुणे ग्रामीण पोलिसांनी तयार केलेल्या रिपोर्टशी पुणे शहर पोलीस सहमत नसल्याचे आंबेडकरांनी आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. 
   

Web Title: Adv Prakash Ambedkar is present before the Bhima Koregaon inquiry commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.