पुणे : भीमा कोरेगाव प्रकरणी आयोगासमोर अॅड प्रकाश आंबेडकर आपली बाजू मांडत असून सुनावणीला सुरुवात झाली आहे. आंबेडकर या सुनावणी दरम्यान वढू गावच्या सरपंचांची उलट तपासणी घेण्याची शक्यता आहे. 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगासमोर अॅड. प्रकाश आंबेडकर आपली बाजू मांडत आहेत. सकाळी 10.30 वाजता या सुनावणीला सुरुवात झाली आहे.
पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या सत्यशोधन समितीने तयार केलेल्या अहवालाचा दाखला आंबेडकरांनी आयोगासमोर दिला. या समितीने केलेल्या संशोधनावर पुणे ग्रामीण पोलिसांनी एक रिपोर्ट तयार केला असल्याचे आंबेडकर यांनी आयोगासमोर सांगितले. पुणे ग्रामीण पोलिसांनी तयार केलेल्या रिपोर्टशी पुणे शहर पोलीस सहमत नसल्याचे आंबेडकरांनी आयोगाच्या निदर्शनास आणून दिले.