पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत व्यवस्थापनच्या जागेवर प्रगती पॅनलचा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 11:54 AM2017-11-27T11:54:44+5:302017-11-27T11:55:58+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत व्यस्थापनच्या प्रतिनिधी पदांच्या ५ पैकी ३ जागा पटकावून विद्यापीठ प्रगती पॅनलने बाजी मारली आहे.

Advance panel flag of management in Pune University Legislative Assembly elections | पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत व्यवस्थापनच्या जागेवर प्रगती पॅनलचा झेंडा

पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत व्यवस्थापनच्या जागेवर प्रगती पॅनलचा झेंडा

Next

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत व्यस्थापनच्या प्रतिनिधी पदांच्या ५ पैकी ३ जागा पटकावून विद्यापीठ प्रगती पॅनलने बाजी मारली आहे. तर विद्यापीठ एकता पॅनलला २ जागा मिळाल्या आहेत. नोंदणीकृत पदवीधरची मतमोजणी सुरु असून त्याचा निकाल रात्री उशीर पर्यन्त लागण्याची शक्यता आहे. व्यवस्थापन प्रतिनिधी पदांच्या जागेवर विद्यापीठ प्रगती पॅनलचे संदीप कदम, राजेंद्र विखे-पाटील विजयी झाले तर सुनेत्रा पवार या बिनविरोध निवडून आल्या. विद्यापीठ प्रगती पॅनेलचे सोमनाथ पाटील, श्यामकांत देशमुख विजयी झाले.
मतमोजणीच्या पहिल्या फेरीत ५६ मते घेऊन सोमनाथ पाटील विजयी झाले. त्यानंतर चौथ्या फेरीत श्यामकांत देशमुख ५१, संदीप कदम ४५ तर राजेंद्र विखे-पाटील ४२ मते घेऊन विजयी झाले.

व्यवस्थापन प्रतिनिधी पदाच्या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एकही उमेदवार नसल्याने ती जागा रिक्त राहिली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूक मतमोजणी प्रक्रियेला सकाळी ८ वाजता सुरूवात झाली. 
नोंदणीकृत पदवीधरांच्या मतांची छाननी सुरू आहे. पदवीधरच्या १० जागांसाठी १९ उमेदवार भवितव्य आजमावत आहेत.

मुख्यमंत्र्याच्या भावाच्या निकालाकडे लक्ष - 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू प्रसेनजीत फडणवीस यांनी अधिसभा पदवीधरची जागा लढवलेली आहे. त्यांच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. रात्री उशीरा पडवीधरचा निकाल जाहीर होईल.
 

Web Title: Advance panel flag of management in Pune University Legislative Assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.