स्वातंत्र्य चळवळीत व उभारणीत वकिलांचा सिंहाचा वाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:09 AM2020-12-08T04:09:34+5:302020-12-08T04:09:34+5:30
पाषाण : जगात भारतीय राज्यघटना चांगली मानली जाते. याचे संपूर्ण श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाच जाते. स्वातंत्र्य चळवळीत व ...
पाषाण : जगात भारतीय राज्यघटना चांगली मानली जाते. याचे संपूर्ण श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाच जाते. स्वातंत्र्य चळवळीत व उभारणीत जर खऱ्या अर्थाने कोणी योगदान दिले असेल तर ते महात्मा गांधी, माजी पंतप्रधान पंडित नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद हे वकिलच होते. आपण आपल्या हक्कासाठी लढणे हीच खरी जबाबदारी आहे. एक घडी बिघडलेली आहे, ती घडी व्यवस्थित होण्यासाठी सर्व वकिलांनी एकत्रित येऊन जबाबदारी समजून येत्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत योगदान दिले पाहिजे, असे मत ॲड. खासदार वंदनाताई चव्हाण यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रभाग क्र .९ च्या वतीने बाणेर परिसरातील वकील बंधु-भगिनींचा ‘गौरव समारंभ’ बंटारा भवन येथे आयोजित केला होता. कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी प्रथम महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले.
चांदेरे म्हणाले, वकिलांचे या समाजासाठी खूप मोठे योगदान लाभले आहे. प्रत्येक क्षेत्रात वकिलांच्या ज्ञानाचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे.
पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष-ॲड. सतीश मुळीक, उपाध्यक्