पुणे : आर्थिक परिस्थिती हालाखीची असूनही केवळ जिद्द, चिकाटी आणि दृढ निश्चय उराशी बाळगून तब्बल एका तपानंतर मनोज चव्हाण याने सीए परीक्षेत यश संपादन केले. बारा वर्षापूर्वी पाहिलेले सीए होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संयमही महत्त्वाचा असतो. त्यामुळेच या यशापर्यंत पोहचला आले, असेही मनोज सांगतो. मनोजचे वडिल मारूती चव्हाण यांनी रिक्षा चालवून तीन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पार पाडली. मनोजच्या आई रंजना चव्हाण यांनीही धुन्या भांड्याची कामे करून त्यांना साथ दिली. लहानशा घरात राहून मनोजने २००६ मध्ये पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुढे सीए होण्याचे स्वप्त्न पाहिले. त्यासाठी कुटुंबाकडून व मित्रांकडून त्याला पाठिंबा मिळाला. मात्र, आर्थिक पाठबळ नसल्याने त्याने काम करून पुढील शिक्षण घेतले. काम करून तीन अॅटेम्टमध्ये तो जुलै २००८ मध्ये पी ई-२ (इंटर परीक्षा) उत्तीर्ण झाला. त्यानंतर २०११ पर्यंत त्याने आर्टिकलशीप केली. काही दिस सुट्टी घेवून त्याने सीए अंतिम परीक्षा अभ्यास केला.त्यात तो परीक्षेचा एक-एक ग्रुप उत्तीर्ण होत गेला.अखेर काही दिवसांपूर्वी लागेल्या परीक्षेच्या निकालात तो उत्तीर्ण झाला.मनोज चव्हाण म्हणाला, आई-वडिल यांनी मला व माझ्या भाऊ, बहिणीला मोठ्या जिद्दीने शिकवले. तसेच सी. ए. सूर्यकांत शहा यांनी सुरूवातीपासूनच मला प्रोत्साहन दिले. मित्रांची व नातेवाईकांची साथ मिळाली.तसेच सीए होण्याची जिद्द मी सोडली नाही. त्यामुळेच मला हे यश मिळाले.
एका तपानंतर ‘तो’ झाला सीए; जिद्द, चिकाटी आणि दृढ निश्चयाच्या बळावर मिळवले यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 1:05 PM
आर्थिक परिस्थिती हालाखीची असूनही केवळ जिद्द, चिकाटी आणि दृढ निश्चय उराशी बाळगून तब्बल एका तपानंतर मनोज चव्हाण याने सीए परीक्षेत यश संपादन केले.
ठळक मुद्देबारा वर्षापूर्वी पाहिलेले सीए होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संयमही महत्त्वाचा : मनोज चव्हाणमनोजचे वडिल मारूती चव्हाण यांनी रिक्षा चालवून तीन मुलांच्या शिक्षणाची पार पाडली जबाबदारी