पुणे: गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीचा मोठा फटका शासनाच्या सर्वच विभागांच्या कर वसुलीला बसला आहे. यामुळे गत वर्षी ग्रामपंचायत करामध्ये देखील मोठी घट होऊन कोट्यवधी रुपयांची थकबाकी निर्माण झाली आहे. परंतु सन 2021-22 आर्थिक वर्षात ऑक्टोबर अखेर पर्यंत घरपट्टी तब्बल 178 कोटी टक्के तर पाणी पट्टी 29 कोटी 99 लाख रुपयांची वसुल करण्यात आली आहे. कोरोना आणि लाॅकडाऊनचा फार मोठा फटका सर्वसामान्यासह सरकारी तिजोरीला देखील बसला आहे. परंतु गेल्या काही महिन्यांत कोरोना रुग्णांची संख्या हळुहळु कमी होऊ लागली असून, याचा चांगला परिणाम आर्थिक स्थितीवर होताना दिसत आहे. कोरोनामुळे गत वर्षी ग्रामपंचायतींच्या घरपट्टीत 17 कोटी 13 लाखांची व पाणीपट्टीची 15 कोटी 71 लाख रुपयांची थकबाकी झाली होती. चालू आर्थिक वर्षांत थकबाकी वसुलीसह नवीन घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीवर अधिक भर देण्यात आला.
ऑक्टोबर अखेर पर्यंत जिल्ह्यात घरपट्टीमध्ये तब्बल 178 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. तर पाणीपट्टीत 29 कोटी 99 लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींनी यावेळी घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी विशेष प्रयत्न केले. अनेक ग्रामपंचायतीने थकबाकीसह चालू कर भरल्यास सवलत योजना जाहीर केल्या. याचा चांगला परिणाम झाला असून ग्रामपंचायतींच्या कर वसुलीमध्ये वाढ झाली आहे. आता पर्यंत 50 टक्के कर वसुली झाली असून, पुढील चार महिन्यांत जास्तीत जास्त कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची ऑक्टोबर अखेर पर्यंत तालुकानिहाय घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीतालुका घरपट्टी पाणीपट्टी आंबेगाव 4 कोटी 25 लाख 1 कोटी 77 लाख बारामती 5 कोटी 88 लाख 4 कोटी भोर 5 कोटी 32 लाख 1कोटी 55 लाखदौंड 7 कोटी 55 लाख 1 कोटी 48 लाख हवेली 18 कोटी 37 लाख 3 कोटी 41 लाख इंदापूर 6 कोटी 39 लाख 1 कोटी 98 लाखजुन्नर 18 कोटी 3 लाख 4 कोटी 39 लाख खेड 10 कोटी 88 लाख 1 कोटी 9 लाख मावळ 14 कोटी 36 लाख 2 कोटी 67 लाखमुळशी 44 कोटी 25 लाख 2 कोटी 31 लाखपुरंदर 5 कोटी 12 लाख 1 कोटी 99 लाखशिरूर 36 कोटी 49 लाख 2 कोटी 78 लाखवेल्हा 1 कोटी 12 लाख 50 लाखएकूण 178 कोटी 6 लाख 29 कोटी 99 लाख
मार्च अखेर पर्यंत जास्तीत जास्त उद्दिष्ट पूर्ण करणार- गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीचा ग्रामपंचायत कर वसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. परंतु यंदा सर्वच ग्रामपंचायतींना जास्तीत जास्त वसुल करण्याचे आदेश दिले असून, मार्च अखेर पर्यंत कर वसुलीचे उद्दिष्ट काढण्याचा प्रयत्न करू.- सचिन घाडगे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी पंचायत