पिंपरी : वाकड येथील एका हॉटेलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या तरूणाचा मृत्यू झाला. याप्रकरणाचा तपास करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. कोरोनाचा विळखा वाढत असताना कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. शहर परिसरात वाढणाऱ्या रुग्णवाढीबाबत प्रशासन सजग नसल्याचे दिसून येत आहे. खासगी रुग्णालये, खासगी कोविड सेंटरवर महापालिका प्रशासनाचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. विठ्ठलवाडी सिंहगड रस्त्यावरील २७ वर्षीय तरूण हा वाकड, भूमकर चौकातील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होता. तो २१ मार्चला तिथे आला होता. त्यानंतर तरूण गंभीर झाल्यानंतर त्यास २५ मार्चला रात्री सव्वा नऊला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी रात्री साडेदहा वाजता त्याचा मृत्यू झाला. २५ मार्चला मृत्यू झाला. कोविडमुळे त्या तरूणाचा मृत्यू झाला आहे, असे वैद्यकीय तपासणी अहवालात नमूद केले आहे.
कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णाची माहिती संकलित करत असताना हा रुग्ण वाकड मधील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. तसेच मृत्यू झालेल्या हॉटेलमध्ये असणारे सीसीसी सेंटरबाबत माहिती मागविली आहे.................खासगी हॉटेलमध्ये सीसीसी सेंटरयाबाबत महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे म्हणाले, ‘‘ सध्या हॉटेलमध्ये कोणत्याही सीसीसी सेंटरला महापालिकेने परवानगी दिलेली नाही. शहरातील शासकीय कोवीड सेंटरची माहिती महापालिकेच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. वाकड येथील प्रकरणाबाबत आम्हाला अद्याप कोणतीही माहिती नाही. याबाबत तपासणी करू. ’’