पुणे : जगभरात ख्याती असलेल्या पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाची सांगता विसर्जन मिरवणुकीने झाली. तब्बल २५ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर अवघ्या तीन तासात पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रमुख विसर्जन मार्ग झाडून चकाचक केले. एकूण ८८३ टन निर्माल्य आणि १ हजार ३०० टन कचरा शहरभरातून गोळा करण्यात आला. विसर्जन मार्गांवरुन २२० टन कचरा गोळा करुन शहर स्वच्छ करण्यात आला. शहरात गणेश विसर्जनासाठी मध्यवस्तीमधील मुख्य घाटांसोबतच उपनगरांमध्येही ५० घाटांची व्यवस्था करण्यात आली होती. घाटांवर सर्वत्र निर्माल्य कलश ठेवण्यात आलेले होते. नागरिकांनीही नदीपात्रामध्ये तसेच अन्यत्र निर्माल्य टाकण्यापेक्षा या कलशांमध्ये टाकणे अधिक पसंत केल्याचे दिसत होते. शहरात एकूण ८८३ टन निर्माल्य गोळा करण्यात आले. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता या प्रमुख विसर्जन मार्गांवर विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी गर्दी झाली होती. या मार्गांवर मोठ्या प्रमाणावर कचराही निर्माण झाला होता. पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थांच्या आणि प्लास्टिक पिशव्यांचा त्यामध्ये सर्वाधिक समावेश होता. शहरातून एकूण २८ हजार ५९० किलो प्लास्टीक कचरा उचलण्यात आला. विसर्जन मिरवणुकांनंतर निर्माण होणाºया संभाव्य कचºयाची स्वच्छता करण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. पालिकेचे तीन हजार कर्मचारी त्यासाठी नेमण्यात आले होते. या कर्मचाºयांनी विसर्जन मिरवणूक संपताच रस्ते झाडायला सुरुवात केली. विसर्जन मार्गांवरुन २२० टन कचरा गोळा करुन हलविण्यात आला. एकट्या विश्रामबाग परिसरामधून ३४ कचरा गोळा करण्यात आल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितले. ====तयारीची थोडक्यात माहितीखबरदारीचा उपाय म्हणून २७० जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. नदीपात्रातील ३७ ठिकाणांसह २४ घाट, ५० हौद, ९८ लोखंडी टाक्या, ३ तलाव, ३ विहीरी, कालव्याजवळील ३६ ठिकाणे अशा एकूण २५१ विसर्जन ठिकाणांवर विसर्जन पार पडले. निर्माल्य गोळा करण्यासाठी ४७ ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. ११६ ठिकाणी कंतेनर ठेवण्यात आले होते. ====स्वच्छ सहकारी संस्था, जनवाणी, आदर पुनावाला क्लिन सिटी, नानासाहेब धर्माधिकारी ट्रस्ट, कमिन्स इंडीया, लायन्स क्लब, श्री फाऊंदेशन, जीवित नदी, मेक माय पुणे सोशल ग्रुप, युथ-द पावर टू चॅलेंज, मैत्री युवा फाऊंडेशन, जाणीव जागृती फाऊंडेशन, रोटेÑक्स, अनुबंध ग्रुप, टेल अस आॅर्गनायझेशन आदी संस्थांनी पालिकेला स्वच्छता, मुर्ती दान आणि विसर्जनामध्ये मदत केली. =====गणेश मूर्तीचे विसर्जन हौद १ लाख ३८ हजार ९५९ टाक्या १ लाख १७ हजार २२३ कॅनॉल १ लाख ३५ हजार २९५ नदीपात्र ९३ हजार ४९० एकुण ५ लाख २६ हजार ८७५====पर्यावरणपूरक विसर्जनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील नागरिकांनी ४ हजार ०२९ गणेश मुर्ती दान करण्यात केल्या. ====१४ टन अमोनिअम बायोकाबोर्नेट मुर्ती दान करणाºया नागरिकांना मोफत सेंद्रिय खत भेट देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यासोबतच गणेश मुर्तींचे घरीच विसर्जन करण्यासाठी पालिकेकडून नागरिकांनी तब्बल १४ टन अमोनिअम बायोकाबोर्नेट घेतले.
पुण्यातील गणेशोत्सवाच्या सांगतेनंतर दीड हजार टन कचरा गोळा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 9:12 PM
तब्बल २५ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर अवघ्या तीन तासात पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रमुख विसर्जन मार्ग झाडून चकाचक केले.
ठळक मुद्देनिर्माल्य ८८३ टन : विसर्जन मार्गावर २२० टनांचा कचरागणेश विसर्जनासाठी मध्यवस्तीमधील मुख्य घाटांसोबतच उपनगरांमध्येही ५० घाटांची व्यवस्था