श्रीकृष्णानंतर अखंड सावधान छत्रपती शिवरायच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:14 AM2021-08-17T04:14:42+5:302021-08-17T04:14:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “भगवान श्रीकृष्णानंतर सदैव सावधान, दक्ष व सम्यक या गुणांचा अंगीकार केलेले नजीकच्या इतिहातील एकमेव ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “भगवान श्रीकृष्णानंतर सदैव सावधान, दक्ष व सम्यक या गुणांचा अंगीकार केलेले नजीकच्या इतिहातील एकमेव व्यक्तिमत्त्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे. महाराज हे सर्वांचे असून सर्व भाषांमध्ये त्यांचे व्यक्तिमत्त्व समजावून सांगितले गेले पाहिजे,” असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.
सारस अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या पन्नासाव्या वर्धापनदिन सोहळ्यात पुरंदरे यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल विद्याधर अनास्कर यांनाही या वेळी गौरविण्यात आले. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते पुरंदरे व अनास्कर या दोघांचा सत्कार करण्यात आला. पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष गणेश धारप, उपाध्यक्ष दत्तात्रय गोडबोले, संचालक शरद पायगुडे, संतोष दाभाडे, विनायक बेहरे, राजाभाऊ चौधरी (जेजुरी), कार्यकारी संचालिका श्रुती सोमण तसेच माजी संघचालक बापू घाटपांडे, सहकार भारतीचे अध्यक्ष मुकुंदराव तापकीर, विश्वास देशपांडे, राजाभाऊ बराटे, शिवराम मेंगडे, कस्तुरी राणे-पायगुडे, धरणीधर पाटील, ॲड. नंदू फडके आदी उपस्थित होते.
शिवशाहीर पुरंदरे म्हणाले, “शिवचरित्र करमणुकीसाठी नाही तर शिकण्यासाठी असल्याची जाणीव हवी. छत्रपतींना अवघे ५० वर्षांचे आयुष्य लाभले, मला १०० वर्षांचे. पण शंभर वर्षांतही महाराज मला पूर्ण समजले असा दावा मी करू शकत नाही.” “अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या पतसंस्था समाजातील तळागाळातील नागरिकांचा पैसा बँकिंग क्षेत्रात आणण्यात मोठी भूमिका बजावतात. पत नसणाऱ्या लोकांना पत देण्याचे काम पतसंस्था करत असल्याने सरकारने सहकार क्षेत्राला बळकटी दिली पाहिजे,” असे अनास्कर म्हणाले.
चौकट
फोटो ‘जेेेएमएडीट’ला मेल केला आहे.
ओळ : सारस अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी पतसंस्थेच्या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे व विद्याधर अनास्कर यांचा स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी डावीकडून अनास्कर, गणेश धारप, पुरंदरे, शरद पायगुडे, स्वामी गोविंददेव गिरी व विनायक बेहरे.