पुणे : दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या क्रीडा गुणांच्या सवलतीमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (२०१८-१९) काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांनी ६ वी ते १२ वी पर्यंत विविध खेळप्रकारांमध्ये मिळवलेल्या प्राविण्याचा विचार होणार आहे. मात्र, त्यांनी दहावी किंवा बारावीमध्ये त्या क्रीडा प्रकारात सहभाग घेतलेला असणे आवश्यक आहे, असे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.दहावी व बारावीचे विद्यार्थी (खेळाडू ) तसेच एनसीसी, स्काउट गाइडमधील विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची सुधारीत कार्यपद्धती राज्य मंडळाने जाहीर केली आहे. शासन निर्णयानुसार जाहीर केलेल्या ११ क्रीडा प्रकारांमध्ये प्राविण्य मिळवले असल्यास त्याचाच विचार होणार आहे. विद्यार्थ्यांनी ६ वी ते १० पर्यंत जिल्हा, विभाग, राज्य, राष्टÑीय, आंतरराष्टÑीय स्तरावर सहभाग घेतला असल्यास त्यांना ५ ते २५ पर्यंत गुण दिले जातील. मात्र त्यानंतर दहावीमध्ये विद्यार्थ्याने संबंधित क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे. १२ वीमध्ये गुणांची सवलत मिळविताना त्याने त्यावर्षी क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली. जिल्ह्याच्या क्रीडा अधिकाºयांनी त्याला प्रमाणित करणे आवश्यक आहे.
स्पर्धांतील सहभागानंतरच दहावी-बारावीत वाढीव गुण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 1:14 AM