पुणे : कॉसमॉस को आॅपरेटिव्ह बँकेने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या योजनांकरिता अनुक्रमे न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी व भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) यांच्याशी सहकार्य करार केला आहे, अशी माहिती कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी दिली. गोयल म्हणाले, या करारामुळे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या कॉसमॉस बँकेच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध होणार आहेत. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या माध्यमातून खातेदारांना ३३० रुपयांमध्ये दोन लाख रुपयांचा जीवन विमा मिळणार आहे़ प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या माध्यमातून खातेदारांना वार्षिक १२ रुपयांमध्ये दोन लाख रुपयांचा अपघात विमा मिळणार आहे़ त्याचा बँकेच्या ग्राहकांनी लाभ घ्यावा. या दोन्ही योजनांची सविस्तर माहिती बँकेच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. या दोन्ही विमा योजनांचा कालावधी १ जून ते ३१ मे असा राहणार आहे. (प्रतिनिधी)
कॉसमॉस बँकेचा दि न्यू इंडिया अॅश्युरन्स, एलआयसीबरोबर करार
By admin | Published: May 27, 2015 1:58 AM