'महत्त्वाच्या पदावरून चुकीचे वक्तव्य टाळावी'; अजित पवारांची भरसभेत पंतप्रधानांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 01:04 PM2022-03-06T13:04:40+5:302022-03-06T13:12:37+5:30

भरसभेत तक्रार अजित पवारांची तक्रार...

ajit pawar avoid misrepresentations by senior officials bhagat singh koshyari | 'महत्त्वाच्या पदावरून चुकीचे वक्तव्य टाळावी'; अजित पवारांची भरसभेत पंतप्रधानांकडे तक्रार

'महत्त्वाच्या पदावरून चुकीचे वक्तव्य टाळावी'; अजित पवारांची भरसभेत पंतप्रधानांकडे तक्रार

Next

पुणे : आजकाल राजकारणात मोठ्या महत्त्वाच्या पदावर बसणाऱ्या व्यक्तींकडून चुकीची वक्तव्य होत आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे याकडे मी लक्ष वेधतो. महान लोकांचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. कोणाबद्दल आकस, आसूया न ठेवता महापुरूषांविषयी अनावश्यक वक्तव्य करू नये, असा टोला नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांना लगावला. 

पुणे मेट्रोचे उद्घाटन आणि इतर विकासकामांच्या उद्घाटनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आले होते. यावेळी कोथरूडमध्ये जाहीर सभा झाली त्यावेळी बोलताना अजित पवारांनी भरसभेत राज्यपालांचे नाव न घेता टोला लगावला.  

पुढे बोलताना पवार म्हणाले, पुणेकरांच्या सहनशक्तीला सलाम करावे लागेल. १२ वर्षांनंतर आज प्रत्यक्षात पुणेकरांची मेट्रो अवतरत आहे. स्वारगेट ते कात्रज, निगडी ते स्वारगेट, वनाज ते रामवाडी, रामवाडी ते वाघोली, खराडी ते हडपसर आणि हडपसर ते स्वारगेट अशा मेट्रो प्रकल्पाचा अहवाल तयार करायचे काम सुरू आहे. या विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण न आणता मदत करावी.

Web Title: ajit pawar avoid misrepresentations by senior officials bhagat singh koshyari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.