कोरोनामुक्ती साठी केलेल्या कार्याची घेतली दखल
बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रात कोरोनामुक्तीसाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या वतीने सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट (स्वित्झर्लंड ) देऊन गौरविण्यात आले.
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसचे यूरोपचे अध्यक्ष विल्यम जेजलर यांच्या मार्गदर्शनाखाली जगभरात ७० देशामध्ये कोरोनामुक्तीसाठी जनजागृती केली जात आहे. तसेच कोरोनामुक्तीसाठी कार्य करण्याची प्रेरणा व प्रोत्साहन मिळण्यासाठी या संस्थेमार्फत व्यक्ती व संस्थांना सन्मानित करण्यात येत आहेे.
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडनचे राष्ट्रीय सचिव डॉ. दीपक हरके यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना मंत्रालयातील उपमुख्यमंत्री दालनात या पुरस्काराने सन्मानित केले. उपमुख्यमंत्री पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेले धडाडीचे व झटपट निर्णय, वैद्यकीय सुविधा प्राप्त करून देण्यासाठी महत्त्वाची भुमिका बजावली. त्यांनी केलेल्या विविध कार्याची दखल घेऊन पुरस्कार दिला गेला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुरस्कार देताना वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्डस लंडनचे राष्ट्रीय सचिव डॉ. दीपक हरके.
०६०९२०२१-बारामती-१२