एके -४७, तोफगोळ्यांचे उत्पादन होणार ठप्प; सैन्यदलांना भासणार शस्त्रटंचाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 01:34 AM2019-08-21T01:34:59+5:302019-08-21T01:35:09+5:30

बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानात बरेच बदल झाले आहे. मागणीचे स्वरूप आणि त्याचा कालावधीदेखील झपाट्याने बदलत आहे. त्या तुलनेत आयुध निर्माणी कारखान्यांमध्ये अपेक्षित बदल झालेले नाहीत.

AK-1, cannons to be produced; Weapons scramble for armies | एके -४७, तोफगोळ्यांचे उत्पादन होणार ठप्प; सैन्यदलांना भासणार शस्त्रटंचाई

एके -४७, तोफगोळ्यांचे उत्पादन होणार ठप्प; सैन्यदलांना भासणार शस्त्रटंचाई

Next

- निनाद देशमुख

पुणे : देशभरातील ४१ आयुध निर्माण कारखान्यांचे कामगार महिनाभराच्या संपावर गेले आहेत. यामुळे संरक्षण सामग्रीच्या उत्पादनात घट होणार असून या काळात जवळपास १ हजार कोटींचे नुकसान होणार आहे. या सोबतच लष्कर, नौदल, हवाईदल आणि निमलष्करी दलाच्या शस्त्रपुरवठ्यावरही परिणाम होणार आहे.
लष्कर, नौदल हवाई दलाबरोबरच निमलष्करी दल आणि पोलीस दलांना लागणाऱ्या शस्त्रांस्त्रांची निर्मिती आॅर्डनन्स फॅक्ट्रीद्वारे करण्यात येते. यात देशी बनावटीचे इन्सास रायफल, एके -४७, मोर्टार, उखळी तोफा, रणगाड्यांना लागणारे तोफगोळे, विविध प्रकारची स्फोटके तसेच शस्त्रात्रे बनवली जातात. लष्कराच्या मागणीतर्फे या कंपन्यांना वर्षभराची आॅर्डर दिली जाते. त्यांच्या मागणीनुसार वर्षभर उत्पादन करून ती पुरविण्यात येते. मात्र, संपामुळे महिनाभर कारखाने बंद राहणार असल्याने संरक्षण सामग्रीवर मोठा परिणाम होणार आहे.
दरवर्षी जवळपास ५२ हजार कोटींच्या शस्त्रांस्त्रांची मागणी संरक्षण दलातर्फे आॅर्डनन्स फॅक्ट्री बोर्डाकडे केली जाते. त्यानुसार देशभरात असणाºया विविध कारखान्यांतून त्याचे उत्पादन करून पुरवठा केला जातो. पुण्यात खडकी येथे अतिविस्फोटके आणि देहू येथे दारुगोळा तयार होतो. प्रामुख्याने देशी बनावटीची इन्सास रायफल, एके-४७, तसेच उखळी तोफांना लागणारा दारूगोळा, छोटी शस्त्रास्त्रे आणि बंदुकांना लागणारे अ‍ॅम्यूनेशन प्रामुख्याने बनविले जाते. मात्र, तिन्ही कंपन्यातील कामगार संपावर गेल्यामुळे हे सर्व उत्पादन ठप्प झाले आहे.

खासगी कंपन्यांचा आधार आवश्यक;
आयुध निर्माणीचे स्पष्टीकरण
बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानात बरेच बदल झाले आहे. मागणीचे स्वरूप आणि त्याचा कालावधीदेखील झपाट्याने बदलत आहे. त्या तुलनेत आयुध निर्माणी कारखान्यांमध्ये अपेक्षित बदल झालेले नाहीत. जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी खासगी कंपन्यांचा आधार घेणे आवश्यक आहे, असे स्पष्टीकरण आयुध निर्माणीच्या केंद्रीय मंडळाकडून देण्यात आले आहे. कामगारांनी पुकारलेल्या संपाच्या पाशर््वभूमीवर मंडळाकडून दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, काही वर्षांमध्ये विविध समित्यांनी आयुध निर्माणी कारखान्यांच्या कार्यक्षमतेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. कामात गती आणि पद्धतशीरपणा यावा, यासाठी आयुध निर्माणी कारखान्यांचे खासगीकरण करणे, खासगी कंपन्यांच्या सहकार्याने उत्पादनक्षमता वाढविणे आदी उपाययोजनांची लवकरात लवकर अंमलबजावणी आवश्यक असल्याचेही समित्यांनी सांगितले आहे. त्या नुसार निर्णय घेण्यात आल्याचे प्रसिद्धपत्रकात म्हटले आहे.

आॅर्डनन्स फॅक्ट्रीच्या कर्मचाऱ्यांच्या संपाचा उत्पादनावर परिणाम होणार असला तरी देशाच्या शस्त्रसज्जतेवर परिणाम होणार नाही. कारण तशी तजवीज आधीच केलेली असते. सरकारने घेतलेला निर्णय हा चांगला आहे. यामुळे शस्त्रास्त्र बनविण्याचा वेग वाढेल. यामुळे कामगारांनी देशहिताचा विचार करून संपाबाबत निर्णय घ्यावा.
- दत्तात्रय शेकटकर, निवृत्त लेफ्टनंट जनरल.

Web Title: AK-1, cannons to be produced; Weapons scramble for armies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे