वैद्यकीय सुविधेसाठी रुग्णवाहिका, ग्रामीण भागात फिरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 01:41 AM2018-11-13T01:41:15+5:302018-11-13T01:42:05+5:30
ग्रामीण भागात काळाची गरज ओळखत व सामाजिक बांधिलकी जोपासत पाबळ (ता. शिरुर) येथील बाराबलुतेदार मंडळींनी
शिक्रापूर : ग्रामीण भागात काळाची गरज ओळखत व सामाजिक बांधिलकी जोपासत पाबळ (ता. शिरुर) येथील बाराबलुतेदार मंडळींनी पाबळकरांच्या वैद्यकीय मदतीसाठी सुसज्ज रुग्णवाहिका समर्पित केली असून त्यांचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत उपजिल्हाधिकारी रोहिणी विरोळे यांनी व्यक्त केले.
बारा बलुतेदार म्हणून जे-जे पारंपरिक व्यवसायात होते तेही नोकरी-धंद्याच्या निमित्ताने गावाबाहेर पडले. मात्र यातील जी कुटुंबे गावात राहिली त्यांचे आपल्या गावाबद्दलचे उत्तरदायित्वाबद्दलची भूमिका जिवंत असल्याचे पाबळकरांनी अनुभवले. गावातील बाराबलुतेदार संघटनेच्या सर्वच सदस्यांनी एकत्र येत रुग्णवाहिका सुरू केली असून ही सेवा ना नफा-ना तोटा तत्वावर देण्यात येणार आहे. प्रमुख देणगीदार शिवाजी गायकवाड व सर्व देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम नंदुरबारचे अतिरिक्त जिल्हाधिकारी कान्होराज बगाटे यांचे अध्यक्षतेखाली पार पडला. तर कार्यक्रमासाठी सरपंच रोहीणी जाधव, उपसरपंच संजय चौधरी, उपजिल्हाधिकारी रोहीणी विरोळे-पाटील, ठाण्याचे सहायक पोलीस आयुक्त शांताराम अवसरे, जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र थोरवे, राजेंद्र देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ सुतार, उपाध्यक्ष सुरेश रायकर, मनोहर जगताप, रघूवीर जगताप, केतन रायकर आदींसह सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय शेंबडे यांनी केले तर आभार शंकर नºहे यांनी मानले.